इतिहास पश्चिम महाराष्ट्र शेती

उसाच्या फडापासून चहाच्या कपापर्यंत साखर किती रंग बदलते?

साखर आपल्या रोजच्या आयुष्याचा भागय. चहावाले लोकं अपल्याइथं पंतप्रधान होऊ शक्त्यात एवढा लोकांचा चहावर जीवाय… त्याला गोडवा येतो साखरेनं….

साखर कशात नाही, साखरेशिवाय गोडी आहे का कशाला. संसारापासून ते मयतापर्यँत, साकरपूडा ते निवद दाखवेपर्यंत…

भारतात साखर म्हणजे नुसता जिन्नस नाय, कल्चर आहे कल्चर!

साखरेपासून नुसता ‘च्या’च गॉड लागत नाही. गोडवा या गुणधर्मामुळे लै ठिकाणी साखर लागते.

आमच्यात तर पंगतीला “मीठ वाढू का “असं म्हणलं कि चापट लावत्यात.

कारण मीठ फक्त मयताला वाढत्यात असा समज. म्हणून मीठाला पण ‘साखर’ वाढू का असंच म्हणायला लागतंय.

पण नक्की ही साखर येते कशी? का? अडग्यागत प्रश्न नाय, मोठा कळीचा प्रश्नय… साखर बनतेच का? कारखान्यात नक्की काय होतं?

सुरवात करूया कारखान्याच्या धुराडीत काय काय व्हतं तेच्यापासून…

ऊस आणि शुगर बीट यांच्यापासून शक्यतो साखर बनवली जाते कारण sucrose.. सुक्रोज म्हंजे गोडवा हो!

सुक्रोजच प्रमाण यांच्यात सगळ्यात जास्त असतं. त्यातल्या त्यात आपल्याकड ऊसापासून मोठया प्रमाणात बनवली जाते. त्यासाठी ऊसाची लागवड करावी लागते.

आपल्याकडं ८६०३२ आणि २६५ हे प्रकार सर्रास लावले जातात.

मग काही ऊस गोड आणि कायकाही कमी गॉड का असतात?

तर साधारण उसाला थंड भागाचं वातावरण लागत. म्हणून कोल्हापूर साईडचा ऊस लै गॉड लागतो. तशी तर साखर पानात आधी बनलेली असते मग खोडात जाते.

मास्तरांनी शिकवलं असल तर विज्ञानाच्या पुस्तकात शिकल्याप्रमाणे प्रककाशसंश्लेषण क्रिया कुठल्याही वनस्पतींच्या पानात आधी होते. म्हंजे साखर बनण्यात सूर्याचा पण मोठा हात आहे.

१२ ते १४ महिन्यांनी ह्याची कापणी (तोड)केली जाते . कारखान्यातर्फे गावोगावी ऊसटोळ्या धाडल्या जातात. हे काम चिटबॉय.

चिटबॉय म्हणजे कारखान्याचा नेमलेला माणूस असतो. जो ऊस लागवडी ची नोंद करतो व त्यानुसार शेतकऱ्यांचा ऊस तोडणी करतो. आजकाल ऊस तोडायची मशीन पण मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

तर त्या प्रत्येक ऊसटोळी मागे ऊसतोड कामगार, त्यांचा मुकदम ,चिटबॉय टॅक्टर-ट्रक वाहतूक एव्हढी यंत्रणा असते. त्यांच्या राहण्याची झोपडी, कोयते, राशन यांची सोय कारखाना करतो. गावात बागायदारतर्फे त्यांना राहायला जागा दिली जाते.

हे कामगार मेनकरून बीड लातूर परभणी उस्मानाबाद नगर जिल्ह्यातुन येतात.

ऊस तोडून कारखान्यापर्यंत नेला जातो. तिथं तो सगळ्यात अशी व्यवस्थित धुतला जातो, नंतर बारीक कांडके केले जातात. नंतर त्यावर रोलर फिरवून किंवा मशीन द्वारे त्याचा चुराडा केला जातो.

रस वेगळीकडे आणि चोथा वेगळीकडे अस वर्गीकरण केलं जातं. हा चोथा म्हणजेच बगॅस. ह्याचा उपयोग वीज तयार करायसाठी होतो.

तर तो रस मोठ्या बॉयलर मध्ये ओतून त्याला तापवलं जातं. त्याला इतकं तापवलं जात की आटून आटून घट्ट बनत. नंतर मिक्सर जसा फिरतो तसा सेन्ट्रीफ्युगल फोर्सने म्हणजे गोल बिंगवुन त्यातलं राहिलेल द्रव पिंजून पिंजून बाहेर काढलं जातं.

आता खाली उरते ती फक्त सॉलिड फॉर्म मध्ये (घन) मध्ये कच्ची साखर.

ह्यात ९६ते ९८ टक्के गोडव्याच प्रमाण असत. ह्याला ब्राउन शुगर असेही म्हणतात, ही पण बऱ्याच पदार्थांमध्ये वापरली जाते. तुमि इम्रान हाश्मीकड बघितली असल ती नाही… तशी असती त कारखान्यांनी तुफान हफ्ते दिले असते.

तिकडे ही साखर ट्रकच्या ट्रक उचलून ट्रान्सपोर्ट केली जाते. हा झाला एक टप्पा. पण ही साखर याच रंगात ‘बालाजी सुपर मार्केट’वाला विकत नाही…

दुसऱ्या टप्प्यात आपल्या घरी जशी साखर असते तशी बनवली जाते. आता ही साखर रिफायनरीत शुद्धीकरण करायला नेली जाते. तिथं ही शुद्ध केली जाते, त्यामध्ये परत ही तापवली जाऊन त्यातले अशुद्ध घटक बाजूला काढले जातात.

त्याला पांढरा रंग देण्यासाठी पिगमेंट(केमिकल) टाकले जातात. आणि दाणेदार स्वरूपात बनवली जाते. नंतर ही वाळवली जाते. वाळल्यानंतर वेगवेगळ्या चाळणीतून टाकली जाते, त्यानुसार ह्याची प्रतवारी ठरते.

मोठी दाणेदार साखर प्रतीला चांगली असते .नंतर ह्याच्या शुद्धतेची क्वालिटी लॅब मध्ये चेक केली. त्यानंतरच पोत्यात घालून गोडाऊनला पाठवली जाते.

तिथून मोठमोठ्या ट्रेडर्स कडून ‘बालाजी सुपर मार्केट’ किराणा दुकानात येते व तिथून आपल्या चहात. शेतकऱ्याकडून २ ते २.५ रुपये /किलो प्रमाणे ऊस घेतला जातो व साखर ३५ ते ४५ रुपये किलो या रेटने विकली जाते.

आता एवढं रामायण सांगायची काय गरजाय?

तर इथून पुढचं साखरेचं महाभारत त्याच्याशिवाय कळणार नाय, म्हणून!

आलाय तर हे पण जा वाचून:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *