मनोरंजनलेख

तू आणि पाऊस

221views

तू आणि पाऊस….

अत्तर रुपी मृदगंध, हवेत अलौकिक गारवा, पावसाची नवखी चाहूल लागली की प्रथम चेहरा तुझा आठवतो, स्वप्नांच्या ओघात मला वाहवत घेऊन जातो, मग मुक्तपणे खिडकीजवळ उभं राहून हात बाहेर काढत तासन तास रमावस वाटतं..

तुला माहितीये मला पाऊस का आवडतो कारण तुझ्यात आणि पावसात मला सतत प्रेमाचा ओलावा मिळतो, तुम्ही ना सारखे आहात प्रेम आलं की हळूवार वर्षाव करता आणि राग आला की मात्र गड गडून बरसता, आपल्या येण्याने सर्वांना प्रसन्न करता,घट्ट मिठी मारली की मग प्रेमळ सुखद गारवा देऊन जाता, म्हणूनच मला पावसात ओथंबून जायला आवडत आणि सरींनी चिंब न्हाऊन निघावस वाटतं….

तू आणि पाऊस मला खूप सुखाऊन जातोस, तुझ्या केवळ एका स्पर्शाने अंगभर शहारे उठवून जातोस, तुझं नाव ओठावर येताच तनमन अगदी मोहरून जातं, म्हणून तू आणि पाऊस यांचं नातं घट्ट बांधून ठेवावस वाटतं….
सगळ्या चिंता दूर सारून फक्त तुझ्या रंगात रंगावस वाटतं…

 

कवियत्री- ऋतुजा देशपांडे

Leave a Response