इतिहासपर्यटनमहाराष्ट्र

पर्वतीचा धार्मिक स्थळ आणि त्याचा इतिहास – पुणे

469views

महाराष्ट्रातील विकसित शहरापैकी पुणे हे एक महत्वाचे शहर आहे. या पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात उभी आसलेली.टेकडी पर्वती या नावाने ओळखली जाते. ही पुण्याच्या विविध भागातुन दिसते. या टेकडीच्या माथ्याची उंची समुद्रसपाठीपासून २१०० फुट आहे. पर्वतीवर जाण्यासाठी १०३ पायऱ्या चढून जावे लागते.

पर्वतीच्या माथ्यावर पाच मंदिरे आहेत. त्यापैकी देवदेवेश्वरेचे मंदिर मुख्य आहे. हे मंदिर आठराव्या शतकात नानासाहेब पेशवे यांनी बांधले आहे.इतर चार मंदिरे कार्तिकेय,विष्णु, विठ्ठल आणि रुक्मिनी हे आहेत.

Parvati Temple Pune

पानीपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांची प्रचंड हानी झाल्यामुळे नानासाहेब पेशवे खचून गेले होते. त्यामुळे त्यांचे निधन पर्वतीवर झाले. मुख्य मंदिर आधुनिक हिंदू शैलीत बांधले आहे. मंदिराचा कळस उंच व निमुळता असुन त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला आहे.

Parvati Temple Pune

मंदिर परिसरातील चौकनी बैठकीत चार कोपऱ्यात चार लहान मंदिरे आहेत. सूर्यदेव(आग्नेय),गणेश(नैर्वत्य),अंबाबाई(वायव्य), विष्णु (ईशान्ये) यांना समर्पित आहेत.१७६६ मध्ये माधवराव पेशवे यांनी चार लहान आणि एक मुख्य मंदिर यांचा समावेश होतो.असे शिव पंचायतन विकसित केले. मंदिरात भगवान शंकर, पार्वती आणि गणेशाच्या धातुच्या मुर्ती आहेत.

Parvati Temple Pune

या तिन मुर्ती १७४९ मध्ये सोन्याच्या बनविल्या होत्या .त्या १९३२ ला चोरीला गेल्या व त्याजागी हुबेहुब दुसऱ्या अन्य धातुच्या मुर्ती बसविल्या आहेत. पर्वतीवर कार्तिकेयच्या मंदिरात महिलांना प्रवेश नाही.पर्वती हे पुणेकरांसाठी महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.

Leave a Response