इतर

पुण्यातील टिकटॉकरने संपवले आपले आयुष्य……!

दिवसा गणिक होत असलेल्या आत्महत्या हा समाजात आता चिंतेचा विषय बनत चाललाय. नुकत्याच घडलेल्या अशाच एका आत्महत्येने लोकसमाज हेलावून गेलाय.

समीर गायकवाड असे त्याचे नाव असून हा टिकटॉक या सोशल मीडियावर सक्रिय होता. आत्महत्येच्या संशयास्पद प्रकरणात, वाघोली परिसरातील फ्लॅटमध्ये रविवारी या 22 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. हि घटना रविवारी संध्याळी घडल्याचे समजते.

पुण्यातील लोणीकंद पोलिस स्टेशनमधील स्टेशन ड्युटी अधिकाऱ्याच्या मते, वाघोलीतील केसनंद रोडवरील त्याच्या फ्लॅटमध्ये युवक मृत असल्याचे समजल्यानंतर समीरच्या चुलतभावाने प्रफुल्ल गायकवाड याने पोलिसांना सांगितले होते. लोणीकंद पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत आत्महत्येचे संकेत मिळत असताना, मृत्यू कशामुळे झाला या घटनांचा नेमका क्रम काय आहे याचा तपशीलवार तपास केला जात आहे. लवकरच ते समीरच्या कुटुंबातील सदस्यांची आणि या प्रकरणाशी संबंधित इतरांची जबाब नोंदवितील.

समीर हा पुण्यातील वाडिया कॉलेज मध्ये शिक्षण घेत होता. टिकटॉकचे व्हिडिओ करणारा हा तरुण तरूणाई मध्ये बराच प्रसिध्द होता. त्याचे गाण्याचे व्हिडिओ ही लोकांमध्ये आवडीचा विषय होता. टिकटॉक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समीरची चांगली फॅन फॉलोइंग असून समीर मराठी प्रेक्षकांमध्ये त्याचे नावा होते. त्याच्या ‘रेडलाइट डायरी ब्लॉग’ सिरिज ला चांगला ऑनलाइन प्रतिसाद मिळाला होता. लोकप्रियता मिळवलेला हा तरूण अचानक असे काही आत्महत्येचे पाऊल उचलेल असे कोणालाही वाटले नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *