इतिहासमहाराष्ट्रलेख

महाराष्ट्र दिन नेमका का साजरा केला जातो?

423views

१ मे म्हणजे महाराष्ट्र दिन पण…
महाराष्ट्र दिन नेमका का साजरा केला जातो?

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभारले. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा आता स्वतंत्र असलेली ‘महाराष्ट्र’ आणि ‘गुजरात’ हि राज्ये एकत्र होती आणि त्या एकत्र राज्याचे नाव ‘बॉम्बे’ असे होते.


भारत सरकारने राज्यांची विभागणी सुरु केली, तेव्हा गुजराती भाषिक बहुसंख्या असलेले ‘गुजरात’ आणि मराठी भाषिक बहुसंख्या असलेले ‘महाराष्ट्र’ अशी दोन स्वतंत्र राज्ये घोषित केली गेली.
पण प्रश्न होता, तो ‘मुंबई’ शहर कोणत्या राज्याला द्यायचे?
याच प्रश्नावरून गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात आंदोलने झाली, लढा झाला. हाच लढा ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ म्हणून ओळखला जातो.

OLYMPUS DIGITAL CAMERA

या लढ्यात जे काही गोळीबार झाले, त्या गोळीबारात बरेचसे हुतात्मे झाले.
त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली आणि म्हणून मुंबईत हुतात्मा चौक बांधण्यात आली.
हा लढा अखेरीस संपून १ मे १९६०, रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य एक स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला आले.

त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली आणि महाराष्ट्र राज्य निर्मिती या दोन गोष्टींचे स्मरण म्हणून ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला जातो.

लाखो शूर, संत, विचारवंत, खेळाडू, कलाकार जन्माला घालणाऱ्या हा पुरोगामी महाराष्ट्र Being Marathi सलाम.
सर्व महाराष्ट्रीयांना ‘महाराष्ट्र दिनाच्या’ खूप खूप शुभेच्छा.…

 

Leave a Response