इतिहासपर्यटन

मुरुड जंजिरा किल्ला

598views

मुरुड जंजिरा किल्ला

महाराष्ट्राला सुमारे ७५० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यावरील किल्ले पाहणे म्हणजे एक आगळी वेगळी आनंदयात्राच ठरते. नारळी फोफळीच्या वनांमधून फिरताना कोकणी समाजाचे दर्शन घडते. रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यात चहुबाजूंनी सागरी पाण्याचा वेढा. यगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. आणि चारी बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत.


इतिहास :
जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. जंजिरा किल्ल्यालाच “किल्ले मेहरुब ऊर्फ किल्ले जंजिरा’ अशी नावे होती. इ.स. १५०८ मध्ये मलिक अहमद निजामशाह मरण पावला. त्याचा ७ वर्षाचा अल्पवयिन मुलगा बुऱ्हाण निजामशाहा गादीवर आला. मिर्झाअल्ली आणि कलब‍अल्ली हे दोन निजामशाही सरदार उत्तर कोकणातील दंडाराजपुरास आले. त्याचवेळी समुद्रातील चाचे कोळ्यांना फार त्रास देत असत. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली.


इ.स. १६२५ मध्ये मलिक अंबर मरण पावला. जंजिरेकर स्वतंत्र सत्ताधीश झाले होते. २० सिद्धी सत्ताधिशांनी मिळून ३३० वर्षेराज्य केले आणि १९४८ मध्ये जंजिरा संस्थान भारतीय संघाराज्यात विलीन झाले. इ.स. १६४८ मध्ये शिवरायांनी तळेगड, घोसाळगड आणि रायगड परिसरातील मुलूख जिंकला. १६५७ मध्ये जावळी जिंकली आणि त्यांनी आपली नजर उत्तर कोकणावर वळवली. किल्ले जंजिरा आपल्या ताब्यात आल्याशिवाय उत्तरकोकणावर आपण वर्चस्व गाजवू शकणारा नाही हे सत्य शिवरायांना उमगले होते. १६५९ मध्ये शिवरायांनी शामराजपंत व त्या सोबत बाजी घोलपला जंजिरा घेण्यासाठी पाठवले पण, हा पहिला प्रयत्न फसला.
पुन्हा १६५९ मध्ये निळोजीपंत रघुनाथ मुजुमदार मायाजी भाटकर यांनी जंजिराच्या सिद्धीची कोंडी केली पण पुन्हा हा प्रयत्न फसला. तिसऱ्या स्वारीचे वर्णन सभासद बखरीत खालीलप्रमाणे दिलेले आहे. “राजियांनी व्यंकोजी दत्तो फौजेनिशी नामजाद रवाना केले. त्यांनी जाऊन मुलूख मारून तलफ केला. मग शिद्दीने आपले जातीचे हापशी लष्कर घोडेस्वार व हशम नामजाद व्यंकोजी दत्तोवर रवाना केले. त्याशी युद्ध झाले. तीनशे हबशी व्यंकोजीपंत मारिले. घोडे पाडाव केले. व्यंकोजीपंत कस्त फार केली. बारा जखमा व्यंकोजीपंतास लागल्या असा चौका बसून आले. शिद्दीने सल्याचे नाते लावले. पण राजियांनी सला केलाच नाही.” ही जंजिऱ्यातील तिसरी स्वारी होती. १६७८ च्या जुलै मध्येशिवरायांनी जंजिऱ्यावर स्वारी करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला. सन १६८२ मध्ये संभाजीराजांनी दादाजी रघुनाथाला जंजिरा घेण्यासाठी पाठवले पण त्याचवेळी औरंगजेब दक्षिणेत उतरल्याने त्याचा जंजिरा घेण्याचा प्रयत्न अपुराच राहीला. या संस्थानाचा शेवटचा अधिपती म्हणजे सिद्धी मुहंमदखान याच्याच कारकिर्दीत अजेय असे जंजिरा संस्थान ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संस्थानात विलीन झाले.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

पीरपंचायतन : किल्ल्याच्या मुख्यद्वारातून आत गेल्यावर डाव्याबाजूला आणखी एक द्वार आहे.
पागा : पीर पंचायतनाच्या समोरच्या दिशेने तटावरून पुढे गेल्यावर घोड्याच्या पागा लागतात.
सुरुलखानाचा वाडा : येथून बाहेर पडल्यावर समोरच ३ मजली पडकी भाक्कम बांधणीची इमारत दिसते यालाच सुरुलखानाचा वाडा असे म्हणतात. अनेक वर्षात या वाड्यची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे.
तलाव :या वाड्याच्या उत्तरेस सुंदर बांधकाम केलेला शोडषट्कोनी गोड्यापाण्याचा तलाव आहे. हा तलाव सुमारे २० मी व्यासाचा आहे. चार कोपऱ्यात चार हौद आहेत.
सदर : बालेकिल्ल्याच्या मागे चुनेगची इमारत आहे. यालाच सदर असे म्हणतात.
बालेकिल्ला : तलावाच्या बाजूने बांधीव पायऱ्यांनी थोडे वर गेल्यावर किल्ला लागतो. आज तेथे एक झेंडा वंदनासाठी उभारलेला आहे.
पश्चिम दरवाजा : गडाच्या पश्चिमेला किंचित तटाखाली, तटातून बाहेर पडण्यासाठी छोटा दरवाजा आहे. यालाच दर्या दरवाजा असे म्हणतात.

गडावर जाण्याच्या वाटा :

१. अलिबागमार्गे : जंजिरा जलदुर्ग पाहायला असेल तर पुणे मुंबई मार्गे अलिबाग गाठायचे. पुढे अलिबागवरुन रेवदंडामार्गे मुरुड गाठता येते. मुरुड गावातून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोटसेवा उपलब्ध आहे. किनाऱ्यापासून किल्ला गाठण्यास अर्धा तास पुरतो.
२. पाली-रोहा-नागोठाणे-साळाव-नांदगाव मार्गे : अलिबाग मार्गे न जाता पाली-रोहा-नागोठाणे-साळाव- नांदगाव मार्गे मुरुडला जाता येते.
३. दिघीमार्गे : कोकणातून यावयाचे झाल्यास महाड-गोरेगाव-म्हसळे-बोर्लिपचंतन दिघी गाठावे. दिघीहून किल्ला पाहण्यासाठी बोटसेवा उपलब्धआहे.
किल्ल्यावर मुरुड गावात राहाण्याची सोय होऊ शकते. गावात जेवणाची सोय होते. किल्ल्यावर पाण्याची सोय नाही. किल्ल्यावर जाण्यासाठी मुरुड गावापासून अर्धा तास लागतो.

Leave a Response