अभिनेता

स्वप्नील जोशी मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार

100views

स्वप्नील जोशी मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार

स्वप्नील जोशी नाव तर सागळ्यांच्याच ओळखीचं…मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार तर हिंदी सिनेमा व मालिकेतील एक नावाजलेला कलाकार.

स्वप्नील म्हणजे एक दिलखुलास व आपल्या काळापात्रावर अपार प्रेम करणारं व्यक्तिमत्व. स्वप्नील चा जन्म 18 ऑक्टोबर 1977 मध्ये मुंबईला झाला. त्याने कॉमर्स मध्ये ग्राजुऐशन पूर्ण केले आणि त्यानंतर त्याने लॉ ची डिग्रीही पूर्ण केली.

 

स्वप्नीलला आपल्या एक्टिंग करियरमधील पहिली संधी वयाच्या 9 व्या वर्षीच भेटली आणि तिही रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेतील ‘कुश’ या पात्रात.

त्यानंतर 1993 मध्ये रामानंद सागर यांच्या ‘कृष्णा’ या दुसऱ्या मालिकेतील ‘कृष्णा’ च्या पात्राने स्वप्नीलच्या करियर ला एक वेगळे वळण आले. या पात्रामुळे त्याला अधिक प्रसिद्धी मिळाली. हा एकच असा अभिनेता आहे ज्याने मराठी-हिंदी या दोन्हीं सुष्टित यशस्वीपणे नाव कमावलं.

‘माणिनी’ या चित्रपटाने स्वप्नीलने मराठी चित्रपटात प्रदार्पण केले. त्यानंतर सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘आम्ही सातपुते’ या चित्रपटातही त्याने काम केले. 2010 ला जेव्हा ‘मुंबई-पुणे-मुंबई’ प्रदर्शित तेव्हापर्यंत स्वप्नील जोशी हे नाव मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रियतेच्या शिखरावर गेलेलं होत. या चित्रपटातील मुक्ता बर्वे सोबतची स्वप्नीलची जोडी चाहत्यांना फार आवडली.

त्यानंतर त्यांनी मंगलाष्टक, मुंबई-पुणे-मुंबई 2, यांसारखे अधिक सिनेमे सोबत केले. दुनियादारी, मितवा, तू ही रे, लाल इश्क हे त्याचे पुढचे गाजलेले चित्रपट. स्वप्नीलने सिनेमासोबतच कॉमेडी सर्कस, पापड पोल यांसारख्या हिंदी मालिका तसेच एका लग्नाची दुसरी गोष्ट, फु बाई फु, एका पेक्षा एक, स्वप्नील जोशी शो, मधू जिथे चंद्र तिथे, यांसारख्या मराठी मालिकाही केल्या. तसेच त्याने बऱ्याच शोचे anchoring आणि काही शो चे परिक्षणही केले.

 

Leave a Response