इतर इतिहास देश बातमी यशोगाथा विदेश

१९७१ युध्दाच्या ५० व्या वर्धापनदिना निमित्त भारताने बांग्लादेशला भेट दिले हेलिकॉप्टर…

1971 च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानवर भारताच्या विजयाचा 50 वा वर्धापनदिन आपण डिसेंबर मध्ये साजरा केला. 16 डिसेंबर 1971 रोजी संपलेल्या युद्धामुळे पूर्व पाकिस्तान मुक्त झाले आणि बांग्लादेश नवीन देश म्हणून जगाच्या नकाशावर उदयास आले. या युध्दात भारताने बांग्लादेश ची मदत करत पाकिस्तानला माघार घेण्यास भाग पाडले. २०२० च्या डिसेंबर मध्ये या युध्दास ५० वर्ष झाली म्हणूनच याला ‘स्वर्णिम विजय वर्ष’ असे म्हणून वर्षभर भारताचा विजय साजरा करण्यासाठी कही कार्यक्रम पण आयोजित करण्यात येणार आहेत.

याच स्वर्णिम विजय वर्षाच औचित्य साधत या ५० वर्षांच्या स्मरणार्थ भारतीय वायुसेनेचे (आयएएफ) प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी बांग्लादेश एअर फोर्स (बीएएफ) ला अलौटे III हे हेलिकॉप्टर भेट म्हणून दिले. तर ढाकाकडून परत भेट म्हणून पारंपारिक F-86 Sabre विमानाचा वारसा आपल्या मिळाला.

दोन्ही विमानांना दोन्ही देशांच्या संग्रहालयांमध्ये अभिमानाचे स्थान मिळेल, असे IAF भदौरिया म्हणाले.

भदौरियाच्या बांगलादेशच्या चार दिवसांच्या प्रवासादरम्यान ढाका येथे या विमानांची देवाणघेवाण झाली, तेथे त्यांनी वेगवेगळ्या एअरबेसेसना भेट दिली आणि त्या देशाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याशी संवाद साधला.

१९७१ च्या युध्दात भारताने पाकिस्तान सैन्याला बांग्लादेशातून हाकलून दिले होते आणि त्यांचे ९०,००० सैन्य शरण आले होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *