बातमी ब्लॉग लाइफफंडा

३ महिन्यात चक्क २० किलो वजन कमी करून झाले फिट कपल…

आजकालच्या या फास्ट लाईफ स्टाईलच्या जमान्यात सगळ्यांनाच आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ राहिलेला नाही. नीट व्यायाम, योग्य आहार, शांत झोप या तीन महत्वाच्या गोष्टी साठीच माणसाकडे वेळ उरला नाहीये. त्यातून फास्ट जगताना फास्ट फूड ची साथ आहेच. या मुळे होणारं नुकसान ही आपल्याला माहित असतं पण आपण त्याकडे दूर्लक्ष करतो. मग शरीराची स्थिती बिघडायला लागली की आपल्या जाग येतेच…..पण तो पर्यंत बराच उशीर झाला असतो. आपल्या हलगर्जीपणा मुळे शरीराचे वजन नको तियकं वाढलेलं असतं. मग डोळ्यासमोर उभा राहतो तो डाइट चार्ट, नको असलेलं बेचव सँलेड, ज्यूसेस आणि खूप व्यायाम….

पण या सगळ्या गोष्टी करूनही, सगळ्या अडचणींवर मात करूनही आज एक जोडपं आपलं वजन कमी करण्याच ध्येय गाठू शकलं ते ही स्वतःच्या जिद्दी च्या जोरावर. ही प्रेरणादायी वायरल गोष्ट आहे आदित्य आणि गायत्री शर्मा यांची. २०१८ सालची ही गोष्ट पण अजूनही कितीतरी लोकांना वजन कमी करण्याची प्रेरणा देते.
आदित्य आणि गायत्री यांच वजन कमी करण्याचा हा प्रवास खरच खुप आश्चर्यकारक आहे.घर सांभाळताना, मुलांचे आई वडिल असताना जेव्हा रोजच्या धकाधकीच्या जीवना मधून वेळ काढून स्वतः कडे लक्ष देण्याचा निश्चय केला जातो तेव्हा काय होऊ शकत याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘शर्मा कपल’ बॉडी ट्रासन्सफॉमेशन.

स्वतःच्या लठ्ठ पणाला कंटाळून जेव्हा आदित्य – गायत्री ने व्यायाम करायचा, जीमला जायचे असे ठरवले तेव्हा अनेक अडथळे आले. बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या. पण या सगळ्यावर मात करत त्या दोघांनी ही आपला वजन कमी करण्याचा ध्यास काही सोडला नाही. आणि त्याचेच फळ म्हणजे ६२ किलो असलेले गायत्री यांचे वजन ३ महिन्यांनंतर ११ किलोने कमी झाले आहे तर ७२ किलो असलेले आदित्यचे वजन २० किलोने कमी झाले आहे. इथपर्यंत पोहचण्यासाठी या दोघांनी बरेच कष्ट घेतले. त्यांनी वर्कआउट करून आहारावर नियंत्रण ठेवलं. व आपला वजन कमी करण्याचा ध्यास नाही सोडला. त्यांचे आधीचे आणि आत्ताचे फोटो पाहणारे अचंबित झाल्याशिवाय राहात नाहीत. आज हे फिट कपल बाकि लोकांना फिट करण्यासाठी मार्गदर्शनाचे ऑनलाईन क्लासेस घेतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *