बातमी महाराष्ट्र राजकारण

अजितदादांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखं

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या खालच्या भाषेतील टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर आता भाजप आमदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे.

अजित पवार यांनी भाषेबद्दल बोलू नये.आज अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती,त्या टीकेस नितेश राणे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता,त्यालाच प्रतिउत्तर देताना अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती.

सीएम गेला उडत अशी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.राणे कुटुंबावर सध्या जोरदार टीका सुरू आहे.कॉंग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना जोरदार टीका करत आहे.महराष्ट्रात सध्या जोरदार शाब्दिक वार रंगले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *