ब्लॉग मनोरंजन महाराष्ट्र महिला विशेष मुंबई राजकारण विदर्भ

तुम्हाला माहित आहे का??? अमृता फडवणीस यांचा ‘सुरेल’ प्रवास…

भारतीय राजकारण्यांच्या पत्नी सामान्यत: राजकीय कार्यक्रमांमध्ये साड्या परिधान करतात, आपल्या पतीच्या पाहुण्यांचे व आपल्या पतीच्या मतदार संघाचे व्यवस्थापन करतात, परंतु यापेक्षा पुढे जाऊन काहीतरी नविन करण्यात यशस्वी ठरल्या त्या अमृता फडणवीस. इतर राजकीय नेत्यांच्या पत्नींच्या रस्त्यावर न चालता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांनी रूढी मोडत काढल्या. अमृता यांनी नागपूरच्या वाणिज्य पदवीधर असून त्यांनी पुण्याच्या सिंबायोसिस महाविद्यालयातून एमबीए केले आहे. त्यांची आई स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वडील नेत्ररोग तज्ञ आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरही त्यांनी अ‍ॅक्सिस बँकेत उप-उपाध्यक्ष म्हणून काम करणे चालू ठेवले आणि नागपूरहून मुंबईत बदलीची मागणी केली.

त्या एक व्यावसायिक बँकर आहे तसेच त्या एक प्रशिक्षित गायिका आहेत आणि त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. आपल्या गाण्याच्या प्रेमामुळे त्या नेहमी म्हणतात, गाणं हे माझ पहिलं प्रेम आहे. प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’ या गाण्याने ‘सब धन मती’ या गाण्याने पार्श्वगायिका म्हणून त्यांनी पदार्पण केले. दिवंगत भाजपा नेते ‘गोपीनाथ मुंडे’ यांच्या जीवनरचनावर आधारित बायोपिक “संघर्ष यात्रा” मध्ये त्यांनी एक गाणे गायले. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या समवेत ‘फिर से’ या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.

तसेच त्यांचे 2018 मधील “मुंबई नदी गाणे” गाणे मुंबई-पोझर, दहिसर, ओशिवारा आणि मिठी या चार नद्यांना वाचवण्यासाठी होते. २०२० मध्ये त्यांनी अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांसाठी “अलग मेरा ये रंग है”, कोरोना योद्धांसाठी “तू मंदिर तू शिवाला” आणि महिला सबलीकरणासाठी “तिला जगू द्या” ही गाणी गायली आहेत. मुंबई पोलिसांच्या कल्याणासाठी प्रतिष्ठित चॅरिटी इव्हेंट ‘उमंग -२०१७’ आणि ‘उमंग’ २०१८’ ’मध्ये गाणे सादर केले आहे.

‘फिर से’ या गाण्याबद्दल बोलताना त्या म्हणतात, फिर से हे खूप सुंदर गाणे आहे ज्याला जीत गंगुली यांनी संगीत दिले आहे. मला व्हिडिओची संकल्पना देखील आवडली आणि मुख्य म्हणजे यात अमिताभ बच्चनजी आहेत. सुदैवाने स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्यांनी व्हिडिओ चित्रित करण्यास सहमती दर्शविली. टी-सीरिजने प्रदर्शित केलेला हा संगीत व्हिडिओ “फिर से” एकाच दिवसात ,७००,००० वेळा पाहिला गेला आणि तीन दिवसांत १.४ दशलक्षांहून अधिक आकडा गाठला.

अमृता यांना त्यांच्या बोल्ड फॅशन स्टेटमेंटसाठीही ओळखले जाते. हे नवीन करियर सांभाळताना अमृता यांना बऱ्याच टिकेला सामोरे जावे लागते. त्यांनी निवडलेल्या मार्गावरून जाताना नेटिझन्सनी त्यांच्या वर नेहमीच काहीतरी टीका केल्या. त्यांना सुरुवातीला खूप ट्रोल केलं गेलं. मुख्यमंत्रांच्या पत्नीने असे काही खुल्या विचारांनी करणे अजून ही लोकांना रुचत नाही.
या लोकांच्या छोट्या विचारांतून आलेल्या टिकेला अमृता यांनी कधीच दाद दिली नाही. त्या आपले कार्य दृढपणे करतच राहिल्या. हाच त्यांचा जीवनाकडे बघण्याचा अंदाज वाखाण्याजोगा आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *