महाराष्ट्र

मुलांनो अभ्यासाला लागा; दहावी, बारावीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परिक्षेचे वेळापत्रक आज जाहीर झाले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत पार पडेल. तर दहावीची परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च या कालावधीत होईल. शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक पाहता येईल. विद्यार्थ्यांना […]

मनोरंजन

कपिल शर्मा एका एपिसोडसाठी घेतो इतके कोटी; ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का

कलर्स टी.व्ही वरील ‘द कपिल शर्मा शो’ कडे सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून पाहिले जाते. यामध्ये कपिलची कॉमेडी आणि इतर कलाकारांची कॉमेडी पाहून हसून-हसून प्रेक्षकांना पोट धरायला लावते. कपिलने प्रेक्षकांच्या मनावर त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र या शोसाठी कपिल शर्मा किती पैसे घेत असेल असा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडलाच असेल ना? मात्र कपिल […]

बातमी

‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाखाली तरुणाला 40 हजाराला लुटले

सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शो चांगलाच चर्चेत आहे. या शो ने तरुणांना भुरळ घातली आहे. हॉट सीटवर बसण्याची अनेक तरुणांची इच्छा आहे. आणि महानायक अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी देखील अनेक चाहते उत्सुक आहेत. मात्र या शो च्या नावाने भामटे फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये नुकताच एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. […]

वायरल झालं जी

चोरांची नविन शक्कल; जेसीबीने फोडले एटीएम मशीन, व्हिडिओ होतोय व्हायरल

चोर आपल्या डोक्यात येणाऱ्या अनेक क्लुप्त्या आजमावत असतात. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चोरांनी एक अनोखी शक्कल लढविली आहे. त्यांनी एटीएम मशीन फोडण्यासाठी चक्क जेसीबी मशीन आणली आहे. हा व्हिडिओ 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. आयलंडमध्ये चोरांनी तोंडाला मास्क लावून गॅस स्टेशनवरील एटीएम मशीन चोरले हे मशीन चोरण्यासाठी […]

बातमी

क्रुरतेचा कळस; ठाण्यात शेफने तरुणीवर केला बलात्कार, अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर

ठाण्यात एका शेफने 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर त्या नराधमाने त्या तरुणीचे अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा उत्तराखंडातील टिहरी गढवाल जिल्ह्यातील रहिवासी आहे. व्यवसायाने तो शेफ आहे. त्याचे नाव  गुरुचरण प्रीतम साहा असं आहे. ठाण्यातील […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी

मोदींच्या सभेसाठी पुण्यातील 20 ते 25 झाडांवर कुऱ्हाड

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबरला पुण्यात भाजप-शिवसेना-रिपाइं (ए) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार आहेत. एस.पी कॉलेजच्या मैदानावर ही सभा होणार आहे. यावेळी सभेला अडथळा ठरणारी कॉलेजच्या परिसरातील जवळपास २० ते २५ झाडे सोमवारी तोडण्यात आली आहे. एसपी कॉलेजच्या मैदानात व्यासपीठ उभारण्याचं काम सुरु आहे. यावेळी अडथळा ठरणारी जवळपास 20 ते 25 झाडे कापण्यात आली आहेत. दरम्यान […]

मनोरंजन

गोविंदाने बदलले चक्क 6 वेळा स्वतःचे नाव

बॉलिवूडचा स्टार अभिनेता गोविंदा त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. गोविंदाने नुकतीच कपिल शर्माच्या शो ला हजेरी लावली होती. यावेळी त्याने स्वतःबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. गोविंदाने सांगितले आपण बॉलिवूड मध्ये येण्यापूर्वी 6 वेळा नाव बदलले असल्याचा मोठा खुलासा केला आहे. त्याचं खरं नाव गोविंदा अहुजा असून त्याने गोविंदा राज, राज […]

मनोरंजन

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पॉप स्टारने केली आत्महत्या

हल्ली सोशल मीडियावर वेळ घालवणे हे एक व्यसन बनत चालले आहे. या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेक जण नैराश्याचा सामना देखील करित आहेत. यामध्ये 14 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांचा देखील सामावेश आहे. आणि या सोशल मीडियावर आणखी एक प्रकार सध्या वाढला चालला आहे तो म्हणजे एखाद्या व्यक्तिला ट्रोल करणे. या ट्रोलिंगमुळे एका आंतरराष्ट्रीय पॉप स्टारने […]

महाराष्ट्र

सहा पोलिसांची हत्या करणाऱ्या नक्षलवाद्याला पुण्यातून अटक

सहा पोलिसांची हत्या करणारा कुख्यात नक्षलवादी साहेब राम हांसदा उर्फ आकाश मुर्मूला याला झारखंड पोलिसांनी पुण्यात अटक केली आहे. 2013 साली नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला होता. यामध्ये दुमका जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमरजित बलियार यांच्यासह सहा पोलीस शहीद झाले होते. या हल्ल्या प्रकरणी साहेब राम हांसद मुख्य आरोपी म्हणून घोषित करण्यात आले होते. साहेब राम […]

महाराष्ट्र

धक्कादायकः पीएमसी बॅंकेत 90 लाख अडकल्याने हृदय बंद पडून खातेदाराचा मृत्यू

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (PMC) बॅकेत 90 लाख रुपये अडकल्याने एका खातेदाराचा हृदय बंद पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजय गुलाटी (वय 51 वर्ष) असे मृत्यू झालेल्या खातेदाराचे नाव आहे. घोटाळ्यामुळे गुलाटी कुटुंबीयांचे तब्बल 90 लाख रुपये पीएमसी बँकेत अडकल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला संजय यांची जेट एअरवेजमधून नोकरी गेली आणि यानंतर […]