राजकारण

गरीब, बेघर लोकांसाठी ‘कम्युनिटी किचन’ योजनाः अजित पवार

रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक, शहरात एकटे राहणारे ज्येष्ठ, गरीब नागरिक यांच्यासाठी खाजगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या सहकार्याने राज्यात‘कम्युनिटी किचन’ सुरु करण्यात यावेत तसेच नागरिकांना ‘रेडी टू इट’ किंवा ‘रेडी टू कूक’ अन्नपदार्थ उपलब्ध करुन द्यावेत असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. […]

महाराष्ट्र

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास सुरु राहणारः मुख्यमंत्री

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन आहे. त्यामुळे नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पण आता नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही कारण जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता 24 तास सुरु राहणार आहेत. गुरुवारी वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली. लॉकडाऊन मुळे लोकांना […]

देश

गोरगरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटी; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

देशातील गोरगरीबांसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोठी घोषणा केली आहे. गोरगरिब आणि कामगारांसाठी 1 लाख 70 हजार कोटींची मदत त्यांनी जाहीर केली आहे. तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचा आरोग्य विमा जाहीर केला आहे. देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. […]

तब्येत पाणी

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या आहेत टीप्स

कोरोना व्हायरसचे थैमान संपूर्ण जगभरात पसरले आहे. देशातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती जास्त पाहिजे असा सल्ला अनेक डॉक्टर देत आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काही उपाय सांगणार आहोत. तुम्ही अन्न जेवढे शिजवून खाताल तेवढी तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. आवळ्याचे पदार्थ खाल्याने […]

लाइफफंडा

घरी बसून काम करताना अशी घ्या काळजी

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अनेकजणांना वर्क फ्रॉम होम सांगितले आहे. पण वर्क फ्रॉम होम करताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. घरी जेव्हा आपण काम करतो, तेव्हा अनेकदा आपण आपल्या सोयीनुसार कसंही बसून काम करतो, ज्यामुळे पाठदुखी आणि कंबरदुखीची समस्या उद्भवते. ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे […]

क्रीडा

गब्बर घरात बसून धुतोय कपडे; पाहा व्हिडिओ

कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षितेचा उपाय म्हणून कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. तसेच क्रिडाविश्वात देखील अनेक स्पर्धा रद्द झाल्यामुळे सध्या भारतीय खेळाडू देखील घरीच आहेत. यामध्ये सेलिब्रेटींचा देखील सामावेश आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू सध्या घरीच आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ […]

वायरल झालं जी

पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु असताना तरुणाने पकडले कान; व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासीयांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संपूर्ण देश पुढील 21 दिवस लॉकडाऊन राहणार असल्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा देत असताना एक तरुण टीव्ही समोर बसला आणि त्याने चक्क कान पकडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या टीक-टॉक व्हिडिओतील तरुण मोदींचे भाषण सुरु असताना कान पकडून बसला होता, आणि […]

देश

कोरोना विरुध्दचे युध्द 21 दिवसांमध्ये जिंकायचे आहेः पंतप्रधान मोदी

“महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकले गेले होते. आज करोनाविरोधातील युद्ध संपूर्ण देशात लढले जात आहे. यासाठी २१ दिवस लागणार आहेत. आपला प्रयत्न आहे की हे युद्ध आपण २१ दिवसांतच जिंकायचं आहे. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान  मोदी यांनी मंगळवारी देशभरात लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर आज (बुधवारी) पहिल्यांदाच आपला मतदारसंघ असलेल्या […]

मनोरंजन

कनिका कपूरचा कोरोनाचा तिसरा रिपोर्टही पॉझिटिव्ह

प्रसिध्द गायिका कनिका कपूरचा कोरोनाचा तिसरा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. सध्या कनिकाची प्रकृती स्थिर आहे. मंगळवारी कनिकाची तिसऱ्यांदा चाचणी करण्यात आली. टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार कनिकाच्या पहिल्या दोन चाचणींच्या रिपोर्टवर तिच्या कुटुंबियांनी शंका उपस्थित केली होती. म्हणून तिची तिसऱ्यांदा चाचणी करण्यात आली. मात्र ही चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. कनिकाची पहिल्यांदा चाचणी केल्यावर आलेल्या रिपोर्टमध्ये तिचे […]

तंत्रज्ञान

लॉकडाऊननंतर फ्लिपकार्टनेही वेबसाईट केली बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संपूर्ण देश पुढील 21 दिवस लॉकडाऊन राहणार असल्याची घोषणा केली. यापार्श्वभूमीवर आता फ्लिपकार्टने देखील आपली वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. “काहीकाळासाठी आमच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. आम्ही लवकरच सुरु करण्याचा प्रयत्न करु. सध्या खूप कठीण परिस्थिती आहे. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. आम्ही तुम्हाला विनंती करतो तुम्ही तुमच्या […]