आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यामनोरंजन

सिनेमागृहात पहिल्यांदाच हा सिनेमा चालणार 24 तास

2.24Kviews

‘अॅव्हेंजर्सः एण्डगेम’ ची सर्वात महागड्या तिकीटाची विक्री भारतात पहिल्यांदा
दहा लाख तिकीटांचं अॅडव्हान्स बुकिंग


हा चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘अॅव्हेंजर्सः एण्डगेम’मध्ये रॉबर्ट डाऊनी ज्युनियर, क्रिस इवान्स, मार्क रुफेलो, क्रिस हेम्सवर्थ, स्कारलेट योहान्सन आणि ब्री लारसन यांची प्रमुख भूमिका आहे.
याआधी ‘कॅप्टन मार्वल’ प्रदर्शित झाला होता.

तिकीट विक्रीच्या बाबतीत भारतात ‘अॅव्हेंजर्स: एण्डगेम’ नवा विक्रम रचला आहे. बुकमायशोच्या माहितीनुसार, एकाच दिवशी ‘अॅव्हेंजर्स: एण्डगेम’च्या 10 लाखांपेक्षा जास्त तिकीटांची विक्री झाली असुन प्रति सेंकद 18 तिकीटाची विक्री झाली आहे.

आतापर्यंत या सिनेमाच्या सर्वात महागड्या तिकीटाची विक्री दिल्लीत झाली आहे तब्बल 2400 रुपयांना तिकीट विकलं गेलं आहे.

मुंबईत 1765 ला सर्वात महागडं तिकीट आयनॉक्सने विकलं होतं.

आतापर्यंत आमीर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चे तिकीट सर्वात महाग म्हणजे 1500 रुपयाला विकले गेलंय.

आतापर्यंत सर्वात उशिरा म्हणजे रात्री 11.30 ला शो व्हायचा आणि परवानगी तेवढ्यापुरतीच मर्यादित होती.
पण ‘एण्डगेम’ला काही लिमिटच नाही. रात्री 12, 1, 2, 3 अहो पहाटे चारच्या शोला सुद्धा बुकिंग सुरु झालं आहे.

या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला असा छप्परतोड प्रतिसाद मिळतोय की या सिनेमाचे शोज 24 तास सुरु ठेवण्याची परवानगी मिळाली आहे.

1 Comment

  1. Dushkali Paristhiti ahe
    Shetkari aatmhatya kartat
    Berojgarana rojgar nahi
    Ashya paristhit shetkari berojgar lokana
    arthik madat nahi karun apan foreign movie la dusarya deshala yevadhe paise mojun dile kharach khup khup khedachi bab gosht ahe.

Leave a Response