आरोग्य

मासिक पाळीचे ते चार दिवस…!

388views

लहानपणी आमची देवभक्त आई अगदी न चुकता देवपूजा करायची,
पण महिन्यातून चार दिवस देवपूजा बंद ठेवायची,
मग माझ्या लहानग्या मनाला प्रश्न पडायचा,की;
का??
अस का करते ती.??
विचारल तर ती सांगयची की सोयगावला अमुक टमुक ला मुलगा झालाय इरधी आहे,
कधी सांगायची सूतक पडलय आपल्याला…
म्हणून देवपूजा बंद आहे.
अस वेळ मारून न्यायची,
घरी सोयगावला असलो की हे 4 दिवस मग स्वयंपाक तिन करायचा नाही..हेच काकुच्या बाबतीत घडायच.
तीही असच 4 दिवस अलिप्त,
त्यांना अशक्तपना यायचा,आजारी पडायच्या,कधी या दिवसात मंदिरात सगळे गेलो तरी त्या बाहेर उभ्या रहायच्या.

माझ मन तेव्हापासुन या कारणाचा शोध घेऊ लागल.एकदा आईंन खुप वेळ डोक खाल्ल्यावर समजवुन सांगितल देखील की लघविच्या जागेतुन रक्त येत,म्हणून अस असत ..इत्यादि इत्यादी.

पण प्रश्न पडायचा की यामुळे अस काय घडत??
की तिला या सर्वांपासून 4 दिवस वेगळ का वागवल जात,
मग हळूहळू शाळेत..कोणत्या मुलीच पोट दुखायच आणि तिला सुट्टीतुन घरी जायच रहायच,मग मुलांची कुजबुज सुरु व्हायची की तिला पाळी आलिये.

दुसऱ्या दिवशी सगळे मुलं तिच्याकडे कुत्सित नजरेंन बघायचे,
हेच कॉलेज मध्ये एखाद्या दिवशी मुलगी लेक्चर बुडवुन पोटात दुखतय म्हणून गेली तर सगळे तिच्याकडे अश्या नजरेन बघणार की काय तिन याचं घोड़च मारलय.

आमचे एक अतिशय विद्वान,विद्याथीप्रिय वयस्कर आणि माझे गुरु असलेले सर प्रैक्टिकल ला 2 तास सलग उभ रहाव लागयच तर प्रत्येक प्रैक्टिकलला सरळ सांगायचे,
की;
“ज्या मुलीला पाळी चालु असेल तिनं स्टूलवर बसून घ्या,नाहीतर रुमवर जाऊन आराम करा मी हजेरी लावतो.”
पण मुल आणि इतर मुलीही अश्या पध्दतींन बघायच्या की आता कोण स्टूलवर बसतय आणि कोण रुमवर जातय,लाजुन कुनिच बसायच नाही.
आणि रुमवरही जायच नाही,
मग आता प्रश्न पडतो की हे कधिपर्यन्त चालणार??
इतकी संकुचित मनोवृत्ति आम्ही कधी सोडणार???
  

आज मी डॉक्टर होतोय,आयुर्वेदाच शिक्षण घेतोय,
मग आपल्यासारखे सुशिक्षित तरुण,जे वाचताय,समाजात फिरताय तेव्हा कूठेतरी आपली जबाबदारी आहे की आपन याविषयी मोकळेपनाण बोलल पाहिजे.

हे चार दिवस खरतर शास्त्रानुसार पहिल तर काय होत हो ??
आपला जन्म ज्या स्त्री बीजांडामुळे होतो ते फलित न झालेले बीजांड बाहेर पड़ते,
रक्त बाहेर पड़ते.
ते नैसर्गिक आहे,ज्या श्रेष्ठ योनितुन आपला जन्म झालाय त्या योनितुन रक्त 4 दिवस वाहत असत,
स्त्रिला अशक्त पना येतो,तिचे मुड स्विंग होतात,
या 4 दिवसात चिडचिड वाढते,
हट्टी बनते,
प्रसंगी ती त्रासामुळे रडतेही,
अश्या वेळी तिला आरामाची सक्त आवश्यक्ता असते.
हे सगळ कुणासोबत घडत तरआपल्या आई सोबत, बहिणिसोबत,
आत्यासोबत,
मामी-मावशीसोबत,
मैत्रिणिसोबत,
प्रेयसीसोबत,
बायकोसोबत,
आणि तुम्ही मुलगी असाल तर तुमच्या स्वताःसोबतही हेच घडत ना दर महिन्यात चार दिवस.

मग अश्या वेळेस
आमची जाबादारी आहे की;

1-आम्ही त्यांची काळजी घेतली पाहिजे

2-त्यांना समजून घेतल पाहिजे,

3-कामात मदत केली पाहिजे,

4-मोकळेपणान बोलल पाहिजे,

आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे
5-त्यांना या काळात कुत्सित नजरेंन पाहन सोडल पाहिजे.

6-अस अलिप्त ठेवून त्यांच्या भावनांशी खेळायला नको,

कोणता देव म्हणतो हो 4 दिवस मला हात लावू नक्को म्हणून,??

आजही माझ्या बहिनी,मैत्रीणी मेडिकलवर जातात,पॅड घेतांना ते काळ्या पिशवितच दिल जात
कुणाला दिसु नये म्हणून,
का अरे पण का
स्वतःच्या आरोग्याची काळजी तिला अशी लपुन छपूण घ्यावी लागते???
उघड्यावर देशी दारुच्या बाटल्या आणणाऱ्या ,नीच समाजाला काय वाटेल हां विचार करुनच का??

बदलुया राव आपण आपल्या नजरेला.
Plzzz

आजही स्त्रियांमध्ये अनेक रोग या काळात विशेष काळजी न घेतल्यामुळे,हवी ती स्वच्छता न ठेवल्यामुळे होत आहेत,
आपण हे कमी करुया
मासिक पाळी ही गोष्ट लाजेची लपवन्याची नाही,
या काळात ती श्रेष्ठ योनी शुद्ध होत असते जिथुन आपला जन्म होतो..
म्हणून आपण आपली नजर बदलवु
या काळात स्त्रियांना समजून घेऊ,
मी तर म्हणतो हे 4 दिवस नोकरदार महिलांना सक्तिचि सुट्टी दिली पाहिंजे.
विद्यार्थिनीना पण सक्तीने समुपदेशन केल पाहिजे.
चला हां विचार करुया
आपल्या आई,बहिन,मैत्रीण,प्रेयसी,बायकोसाठी,स्वतःसाठी.
आम्हाला आपल्या विशाल हृदयात नेहमीच सांभाळून घेणाऱ्या स्त्री मनासाठी आपन ऐवढ नक्की करुया.

स्वतः बदलुया
समाज बदलुया.
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
✏तुमचाच भाऊ /मित्र
डॉ स्वप्निल छायाविलास चौधरी.
9420257567
🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗

 

Leave a Response