Marathi Movies

उलगडणार ध्यासाचा प्रवास: ‘बाळा’- मराठी चित्रपट

207views

लहान मुलांन केंद्रस्थानी ठेवूनn भवतालचे अनेक प्रश्न आजवर चित्रपयच्य माध्यमातून मांडण्यात आले आहेत.
आजच्या काळात शिक्षणला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून, पदव्या हा त्याचा
मापदंड मानला जातो. या व्याख्येमुळे पाल्यने जास्तीत जास्त शिकून पदवी मिळवलीच पाहिजे
हा बहुसंख्य पालकांचा अट्टाहास असतो. मुलांच्या भावना, विचार, मते जाणून घेणंही तितकंच
महत्त्वचं आहे. स्पर्धेच्या आजच्या युगात मुलं मानसिकदृष्ट्या दबलेली असताना त्यांची आवड व गरज लक्षात घेणं अपरिहार्य झलं आहे.

मात्र अनेक पालकांकडून हे होतान दिसत नाही. चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय प्रभावपणे
मांडत, मुलांना घडविताना त्यांच्या भावना जाणून घेणं ही काळाची गरज आहे हे सांगू पाहणारा
‘बाळा’ हा चित्रपट ३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘यश अँड राज एंटरटेन्मेट’ या बॅनरखाली य चित्रपटाची निर्मिती निर्माते राकेश सिंग
यांनी केली असून सचिंद्र शर्मा यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचा नयक बाळा याला क्रिकेटपटू
व्हायचंय, त्याच्या वडिलांना, मात्र त्याने वेगळे करिअर करावं असं वाटत असतं. बाळा आणि त्याच्या
वडिलांचा हाच संघर्ष य चित्रपयत पहायला मिळणार असून, बाळाच्या क्रिकेटवेडाची, त्याच्या ध्यासाची
कथा ‘बाळा’ या चित्रपटातून उलगडणार आहे.

उपेंद्र लिमये, क्रांती रेडकर, विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत या मातब्बर कलाकारांसोबत
मिहीरेश जोशी हा नवा चेहरा, तसेच यशवर्धन- राजवर्धन, आशिष गोखले, ज्येती तायडे, अपेक्षा
देशमुख, हिया सिंग
हे सहकलाकार या चित्रपयत दिसणार आहेत. ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर
क्रिकेट प्रशिक्षकाच्या विशेष भूमिकेत दिसणार आहेत.

‘बाळा’ ३ मेपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Response