Marathi Televisionअभिनेत्रीताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

प्रिय अभिनेत्री केतकी चितळे यांस…

4.33Kviews

दि.20/6/2019

प्रति,
सन्माननीय अभिनेत्री
केतकी चितळे.

सप्रेम नमस्कार !

विषय – मराठी भाषिक चाहत्यांच्या भावना दुखावल्या बाबत.

मालिका व सिनेजगतात एक मराठी भाषिक कलावंत म्हणून आपला नेहमीच आदर राहिला आहे.

जो पर्यंत तुम्ही आपल्या माय मराठीचा अभिमान बाळगून होतात, तो पर्यंत कोणत्याही व्यक्तीने तुम्हाला अथवा तुमच्या अभिनयाला दूषणे देण्याचे धाडस केले नाही. कारण तुमच्यावर प्रेम करणारा तमाम मराठी भाषिक चाहतावर्ग तुमच्या सोबत खंबीरपणे उभा होता. परंतु दिनांक ९ जून रोजी तुम्ही स्वतःहूनच आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट करून मराठी भाषेला हीन ठरविण्याचा निंदनीय प्रकार केलात आणि स्वतःहूनच वाद ओढावून घेतलात.

एक गुणी अभिनेत्री म्हणून तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि कोणत्याही प्रसंगात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या मराठी भाषिक चाहत्यांच्या भावना या व्हिडीओमुळे दुखावल्या गेल्या याला जबाबदार कोण? याचा विचार आपण स्वतःच करावा.

मराठी सोबतच हिंदी सिनेजगतात आपला वेगळा ठसा उमटवलेल्या वर्षा उसगावकर, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, प्रिया बापट या देखील अभिनेत्री आहेत परंतु यांनी कधीही मराठी भाषेला हीन ठरविले नाही. त्यामुळे आजही मराठी भाषिक चाहत्यांना त्यांचा सार्थ अभिमान आहे.

खरं तर तुमच्या या व्हिडिओ मागे प्रसिद्धी मिळविण्याचा कोणता अदृश्य हेतू होता का? अशी शंकाही आता चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

आपण मराठी भाषेला हिणविण्याचा आणि शिवरायांच्या मावळ्यांचा उल्लेख करीत त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न ज्या व्हिडीओद्वारे केला त्यामधील आपल्या भाषेतील ओळी जशाच्या तशा खाली लिहित आहोत.
👇

“हिंदी भाषिक सुद्धा माझे फॉलोअर आहेत, त्यामुळे मराठीचे झेंडे इथे फडफडवू नका. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. ती तुम्हाला यायलाच पाहिजे. त्यामुळे मराठी विसरलीस का ? मराठी सिरीयल मध्ये काम करतेस, ब्ला-ब्ला- ब्ला.. नॉनसेन्स” ही आपली वाक्ये त्या व्हिडिओच्या सुरवातीला आहेत.

तो व्हिडीओ आम्ही एडिट अथवा मॉर्फ केलेला नाहीये. तो व्हिडीओ जसाचा तसा आम्ही आमच्या पेजवर टाकला आणि चाहत्यांना या व्हिडीओ विषयी काय वाटते ते विचारले ? लोकांनी आपल्या भावनांना आवर घालत त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

खरं तर बिईंग मराठी पेज वरून अनेकदा तुमच्या अभिनयाबद्दल कौतुक करणाऱ्या पोस्ट आम्ही मनमोकळेपणे केल्या आहेत. तेंव्हा तुमच्यासाठी आमचे पेज चांगले होते.

आमच्या पेजवर टाकलेल्या व्हिडीओ खाली अश्लील कमेंट्स आलेल्या नाहीत. त्या साठी व्हिडीओ पोस्ट केल्याची लिंक देत आहोत. सर्व कमेंट्स वाचणे. उलट तुमच्याच पेजवर टाकलेल्या व्हिडीओ खाली लोकांनी तीव्र शब्दात त्यावर टीका केली आहे.

.

मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करून नाव कमवलेल्या अभिनेत्री केतकी चितळेचे मराठी भाषेबद्दलचे मत ऐका😔

Posted by Being Marathi on Tuesday, June 11, 2019

 

 

बिईंग मराठी पेजने कधीच महिलांचा अनादर, अपमान केलेला नाही. किंवा तशा प्रकारचा मजकूर, व्हिडीओ अथवा कमेंट्स केलेल्या नाहीत, महिलांप्रति अश्लील बोलणाऱ्या लोकांवर कठोरात-कठोर कारवाई व्हावी हीच आमची भूमिका आहे आणि भविष्यात ही असेल.

गैरसमजातून आपण बिईंग मराठी पेजने तुम्हाला शिवीगाळ केली, बलात्काराच्या धमक्या दिल्या हे आपण सन्मानीय आमदार नीलमताई गोऱ्हे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ते अतिशय चुकीचे आणि धादांत खोटे आहे. आमच्या पोर्टलची नाहक बदनामी आपण करू नये.

बिईंग मराठी हे एक Entertainment पोर्टल आहे, या पेजवर टाकलेल्या पोस्ट/व्हिडीओ खालच्या कमेंट्सला बिईंग मराठी समूह जबाबदार नाही. ही जबाबदारी त्या सदरील कमेंट्स करणाऱ्या व्यक्तीची आहे. लोकमत फेसबुक पेजवरच्या बातम्याखाली कमेंट्स मध्ये कोणी राजकारणी-अभिनेत्याला शिव्या दिल्यावर त्यास लोकमत समूह जबाबदार आहे का ? लोकसत्ता पोर्टलवर कोणी एखाद्याला वाईट बोलल्यावर त्याला लोकसत्ता समूह जबाबदार आहेत का ? ABP माझा पेजवर कोणी वाईट बोलले तर त्याला Abp माझा समूह जबाबदार आहेत का ? ज्या लोकांनी ट्रोलिंगच्या माध्यमातून आपल्यावर अश्लील टिप्पणी केली त्यांचे नावे, अकाउंट उपलब्ध असताना त्यांना सोडून पोर्टलवर कारवाई करा ही आपली मागणी म्हणजे अनाकलनीय आहे.

पूर्वग्रहदूषितपणा मनात ठेवून आकस बुद्धीने आमच्या विरोधात आपणास कारवाई करायची असल्यास, ते अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषिक प्रेमी जनतेच्या प्रेमाच्या बळावर आणि भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आम्ही या प्रकरणी कायदेशीररित्या लढा देण्यास आम्ही तयार आहोत. मराठी अस्मितेशी तडजोड केली जाणार नाही.

टीम बिईंग मराठी

Leave a Response