काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट क्रीडा

पॅट क्युमिंस आवाहानाला ब्रेटलीचा प्रतिसाद,भारताला केली तब्बल 41 लाखांची मदत

काल ब्रिटनचा क्रिकेटर पॅट क्युमिंसने सर्व खेळाडूंना भारताला मदत करण्याचे आव्हान केले.त्याला प्रतिसाद देत ब्रेट ली या ऑस्ट्रेलियन खेळांडुने भारताला ऑक्सिजनसाठी तब्बल 41 लाखांची मदत केली आहे.

ब्रेट ली म्हणतो भारतासाठी माझ्या हदयात एक खास जागा आहे.मी जेव्हा मैदानावर खेळत होतो तेव्हा आणि आता सुद्धा मला तिथून खूप प्रेम मिळत आहे.येथील लोक सध्या संकटात आहे हे पाहून मला फार दुख होत आहे.

भारतातील ऑक्सिजनचे संकट दूर व्हावे यासाठी मी संपूर्ण भारतात काम करणाऱ्या क्रीपटो रीलीफ या फंडास 1 बीटकॉईन्स इतकी मदत देत आहे.

हीच ती वेळ आहे जेव्हा आपण सर्वानी शक्य तितकी मदत करायला हवी.फ्रंट लाइन वर्क्सस आणि सर्व मेडिकल स्टाफचे मी आभार मानतो.सर्वानी घरी रहा.हात धूत रहा.काळजी घ्या.

मास्कचा वापर करा.कोविडच्या नियमांचे पालन करा. पॅट क्युमिंस तुझे देखील कौतुक काल तु जो मदतीचा पुढाकार घेतला त्या बद्दल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *