लाइफफंडा

लॉकडाऊनमध्ये असे राहा तुम्ही पॉझिटिव्ह

कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. त्यामुळे पुढचे 21 दिवस सगळ्यांना घरात बसून राहायचे आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल की, एवढे  दिवस घरी बसून करायचे काय? त्यामुळे तुमच्या मनात नकारात्मक विचार देखील येत असतील त्यासाठी आज आम्ही तुम्हाला लॉकडाऊनच्या काळात पॉझिटिव्ह कसे राहायचे  याची माहिती देणार आहोत. स्वयंपाकातूनही एक वेगळा आनंद मिळतो. […]

लाइफफंडा

घरी बसून काम करताना अशी घ्या काळजी

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अनेकजणांना वर्क फ्रॉम होम सांगितले आहे. पण वर्क फ्रॉम होम करताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. घरी जेव्हा आपण काम करतो, तेव्हा अनेकदा आपण आपल्या सोयीनुसार कसंही बसून काम करतो, ज्यामुळे पाठदुखी आणि कंबरदुखीची समस्या उद्भवते. ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे […]

लाइफफंडा

उद्या अशी करा गुढीपाडव्याची पूजा; पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केलं मार्गदर्शन

उद्या गुढीपाडवा आहे. उद्यापासून मराठी नव्या वर्षाची सुरवात होत आहे. आनंदाची, मांगल्याची गुढी उभी करून तिचं पूजन करून नवा संकल्प करायचा असतो. मात्र जगभरासह भारत आणि महाराष्ट्रावर आलेलं कोरोनाचं संकट दूर व्हावं यासाठी सर्वच जण उद्या गुढी उभारताना प्राथर्ना करतील. संपूर्ण देश आज मध्यरात्रीपासून पुढचे 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर […]

लाइफफंडा

Janata curfew: तुम्हाला घरात राहून करता येतील ‘ही’ कामे

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (22 मार्च) रोजी जनता कर्फ्युची घोषणा केली आहे. त्यामुळे आज सगळेजण घरी आहेत. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल की आज घरी बसून काय करायचे तर आज आम्ही तुम्हाला घरी बसून करता येण्यासारखी  काही काम सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला बोरही होणार नाही आणि तुम्ही एन्जॉय देखील […]

लाइफफंडा

गुगलनेही कोरोनापासून काळजी घेण्यासाठी केले खास डुडल

सध्या देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देशात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारकडून या विषाणूला रोखण्यासाठी अनेक उपाय योजना राबविल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर आता गुगलनेही कोरोना व्हायरसपासून नागरिकांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी यासाठी खास डुडल तयार केले आहे. गुगलने या डुडलमधून हात नेमके कसे धुवावेत, हात […]

लाइफफंडा

कोरोना रुग्णांसाठी दिला जातोय ‘हा’ स्पेशल आहार

कोराना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. देशातही कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडूनही मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णांना आयसोलेशन सेलमध्ये मध्ये ठेवण्यात आले आहे. या रुग्णांसाठी स्पेशल मेन्यू तयार करण्यात आल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. केरळमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन सेल आहे. या आयसोलेशन […]

लाइफफंडा

होम क्वारंटाइन म्हणजे काय ? अशी घ्या काळजी

कोरोनाव्हायरस रुग्णाच्या संपर्कात आल्याची शक्यता असेलल्यांना होम क्वारंटाइन करण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. चला तर जाणून घेऊयात होम क्वारंटाइन म्हणजे काय किमान 14 दिवस तरी इतरांपासून वेगळे ठेवले जाते. त्यांना होम क्वारंटाइन म्हणतात. जर एकाच खोलीत कुटुंबातील इतर सदस्यही राहत असतील तर किमान एक मीटर अंतर ठेवावं. सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ, बाजारात जाणं टाळावं साबण आणि […]

लाइफफंडा

तुम्हाला चहा पिण्याची अशी सवय आहे; तर होऊ शकतो आरोग्यावर परिणाम

काही जणांना चहा कोणत्याही वेळी दिला तरी ते पिऊ शकतात. मात्र जर चहा तुम्ही चुकीच्या पध्दतीने पित असाल तर तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला सकाळी रिकाम्यापोटी चहा पिण्याची सवय असेल तर भूक मरते. पित्ताचा त्रास होतो. रात्रभर शरीराला पाणी मिळत नाही, त्यामुळे शरीर डिहायड्रेट झालेलं असतं. अशावेळी तुम्ही चहा प्यायल्यास  डिहायड्रेशनची समस्या वाढते. […]

लाइफफंडा

ऑफीसमध्ये 9 तास बसून काम करताय तर आहे ‘या’ आजारांचा धोका

जर तुम्ही ऑफीसमध्ये 9 ते 10 तास बसून काम करत असाल तर तुमचे आरोग्य धोक्यात आहे. तुम्हाला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. डिप्रेशन आणि हर्ट अटॅक येऊ  शकतो. त्यासोबत हायपर टेन्शन, स्ट्रोक, डिप्रेशन, मसल्स पेन, बॅक पेन, सर्वाईकल आणि स्लिप डिस्कसारख्या समस्याचा त्रास होऊ शकतो. “दररोज अधिक काम केल्याने मित्र आणि कुटुंबासोबत कमी […]

लाइफफंडा

बदाम खाण्याची योग्य वेळ तुम्हाला माहिती आहे का?

तुम्ही बदाम कोणत्या वेळेला खाता आणि किती खाता हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. तरच त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. खेळाडूंनी बदाम खायलाच हवेत. तुम्हीदेखील खेळाडू असाल आणि वर्कआऊट करत असाल तर वर्कआऊटच्या वेळेनुसार बदाम खा. सकाळी वर्कआऊट करत असाल, तर सकाळी आणि संध्याकाळी वर्कआऊट करत असाल तर संध्याकाळी बदाम खा. वजन कमी करायचं असेल, […]