देश विदेश

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ब्रिटनला मोठा धक्का बसला आहे. बोरिस जॉन्सन यांनी ट्विट करत स्वत: आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, “गेल्या २४ तासांपासून मला काही हलकी लक्षणं जाणवत होती. तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. […]

बातमी

शिर्डी साईबाबा संस्थानची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 51 कोटींची मदत

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शिर्डी साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 51 कोटींची मदत देण्याचा निर्णय साईबाबा संस्‍थानच्‍या समितीने घेतला असल्‍याची माहिती मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिर समितीने कोरोनाच्या भयान संकटातून लवकरात लवकर बाहेर पडावं यासाठी सरकारचे हात बळकट करण्यासाठी 51 कोटी रूपयांची भरघोस मदत केली आहे.  देवस्थान प्रशासनाने […]

महाराष्ट्र

आनंदाची बातमी; महाराष्ट्रातील 19 रुग्ण कोरोनामुक्त

सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पण अशातच नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आतापर्यंत ४,२२८ जणांची Covid-19 ची चाचणी करण्यात आली. त्यात ४,०१७ जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला तर १३५ कोरोना पॉझिटिव्ह […]

बातमी

देशातील सगळ्यात मोठे कोरोना हॉस्पिटल ‘या’ राज्यात उभारणार

देशातील सगळ्यात मोठे कोरोना हॉस्पिटल ओदिशा सरकार उभारणार आहे. या हॉस्पिटल मध्ये तब्बल 1 हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. ओदिशा सरकार, कार्पोरेट्स व वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयातून एक हजार खाटांची व्यवस्था असणारे हे देशातील पहिले भव्य असे ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारले जात आहे. यासाठी एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी देखील करण्यात आली आहे.

महाराष्ट्र

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास सुरु राहणारः मुख्यमंत्री

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन आहे. त्यामुळे नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पण आता नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही कारण जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता 24 तास सुरु राहणार आहेत. गुरुवारी वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली. लॉकडाऊन मुळे लोकांना […]

देश

गोरगरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटी; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

देशातील गोरगरीबांसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोठी घोषणा केली आहे. गोरगरिब आणि कामगारांसाठी 1 लाख 70 हजार कोटींची मदत त्यांनी जाहीर केली आहे. तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचा आरोग्य विमा जाहीर केला आहे. देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. […]

देश

कोरोना विरुध्दचे युध्द 21 दिवसांमध्ये जिंकायचे आहेः पंतप्रधान मोदी

“महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकले गेले होते. आज करोनाविरोधातील युद्ध संपूर्ण देशात लढले जात आहे. यासाठी २१ दिवस लागणार आहेत. आपला प्रयत्न आहे की हे युद्ध आपण २१ दिवसांतच जिंकायचं आहे. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान  मोदी यांनी मंगळवारी देशभरात लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर आज (बुधवारी) पहिल्यांदाच आपला मतदारसंघ असलेल्या […]

बातमी

देशातील 80 कोटी लोकांना 2 रुपयात गहू आणि 3 रुपयात तांदूळ मिळणार

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश पुढील 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडल नाही तर काम नाही…काम नाही तर पैसे नाही अशी काही लोकांची स्थिती झाली आहे. त्यामुळे केंद्रसरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील ८० कोटी लोकांना २७ रुपये किलोचा गहू २ रुपये किलोने देणार तर ३७ रुपये किलोचा तांदूळ ३ […]

महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 116 वर

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 116 वर पोहोचली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. मुंबईत एकूण कोरोना रूग्ण 45 कोरोनाबाधित सापडले आहेत. मुंबईत रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. सांगतील एका कुटुंबातील 5 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 116 वर पोहचला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस […]

बातमी

संपूर्ण देश आज मध्यरात्रीपासून 21 दिवस लॉकडाऊन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आज मध्यरात्रीपासून संपूर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन करण्यात येणार आहे. पंतप्रधान म्हणाले, 22 मार्चला देशवासियांनी  जनता कर्फ्यूमध्ये आपलं योगदान दिलं. संकटाच्या या काळात सर्व एकत्र आले आणि जगाला दाखवून दिलं. मानवता आणि देशावर संकट आलं तर आम्ही सर्व भारतीय एकत्र येवून त्याचा सामना करतो हे जगाला […]