देश विदेश

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ब्रिटनला मोठा धक्का बसला आहे. बोरिस जॉन्सन यांनी ट्विट करत स्वत: आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, “गेल्या २४ तासांपासून मला काही हलकी लक्षणं जाणवत होती. तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. […]

देश विदेश

‘या’ देशाच्या पंतप्रधानांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. या कोरोना व्हायरसच्या विळख्यात जगभरातील नामांकित व्यक्तीही सापडले आहेत. यामध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पत्नी सोफी जॉर्जिया-ट्रुडो यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपासून सोफी यांना सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास होत होता. याच पार्श्वभूमीवर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचे निकाल नुकतेच हाती आले […]

देश विदेश

कोरोनाचे संकट; तीर्थयात्रेसाठी इराणमध्ये गेलेले महाराष्ट्रातले 600 भाविक अडकले

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तिर्थयात्रेसाठी इराक आणि इराणमध्ये गेलेले महाराष्ट्रातील 600 भाविक इराणची राजधानी तेहेरानमध्ये अडकले आहेत. तर देशभरातून तिथे 2 हजार भाविक अडकलेले आहेत.  कोरोना व्हायरसमुळे या देशांनी सीमा बंद केल्याने महाराष्ट्रातील भाविकांना तेथे अडकून पडावं लागलंय. आम्हाला मायदेशी घेऊन या असं आवाहन हे भाविक सरकारला […]

देश विदेश

‘कट कॉपी पेस्ट’चे जनक काळाच्या पडद्याआड

कम्प्युटर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. ज्याच्याशिवाय आपले काम पूर्णच होऊ शकत नाही. आणि कम्प्युटरवर काम करत असताना आपण सगळ्यात जास्त कट, कॉपी, पेस्ट या पर्यायांचा वापर करत असतो. याच कम्प्यूटरचा वापर करणे सोप व्हावं म्हणून १९७० च्या दशकात लॅरी टेसलर यांनी कट, कॉपी, पेस्टचा पर्याय शोधून काढला. आज याच लॅरी यांचे वयाच्या […]

बातमी विदेश

अमेरिकेचा पुन्हा इराकवर हल्ला; 6 जणांचा मृत्यू

अमेरिकेने आज पुन्हा इराकवर हल्ला केला आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला बगदादमधील ताजी भागात झाल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यामध्ये मिलिशियाच्या तीनपैकी दोन वाहने जळून खाक झाली. हवाई हल्ल्यात या वाहनांमध्ये असलेले 6 लोक ठार झाले. स्थानिक वेळेनुसार हा हल्ला रात्री 1 वाजून 12 […]

बातमी विदेश

आश्चर्यकारक: महापौरपदी अवघ्या सात महिन्यांचा चिमुकला विराजमान

तुम्हाला जर कोणी सांगितले की, अवघ्या सात महिन्यांचा चिमुकला महापौरपदी विराजमान झाला आहे. तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र असाच एक प्रकार अमेरिकेच्या टेक्सासमध्ये घडला आहे. अवघ्या सात महिन्यांच्या विलिअम चार्ल्स चार्ली मॅकमिलिअनला व्हाईट हॉलचा महापौर बनवण्यात आलं आहे. हा चिमुकला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा महापौर ठरला आहे. व्हाईट हॉल कम्युनिटी सेंटरमध्ये 150 […]

विदेश

आश्चर्यकारक गोष्ट; चक्क एका आईने गरोदर बाळाला दिला जन्म

एका आईने चक्क गरोदर बाळाला जन्म दिल्याची आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे. तुम्हाला देखील हा प्रकार ऐकूण आश्चर्याचा धक्का बसला असेल ना? पण हा प्रकार कोलंबियातील एका रूग्णालयात घडला आहे. हा प्रकार कोलंबियातील बाराक्वेंलीमधील मोनिका वेगासोबत घडला आहे. मोनिका वेगा यांच्या गर्भात दोन बाळ असल्याच समोर आलं. बाळाला जन्म देण्यापूर्वी दोन महिने अगोदर या महिलेच्या गर्भात […]

विदेश

अबब; या देशात 5 टोमॅटो घेण्यासाठी 50 लाख द्यावे लागतात

तुम्हाला जर कोणी सांगितले 5 टोमॅटो घेण्यासाठी 50 लाख मोजावे लागतील तर यावर तुमचा देखील विश्वास बसणार नाही ना? मात्र हे खरं आहे. व्हेनेझुएलामध्ये महागाईमुळे 5 टॉमेटो  विकत घेण्यासाठी तेथील नागरिकांना 50 लाख बोलिव्हर मोजावे लागतात. बोलिव्हर हे व्हेनेझुएलाचे चलन आहे. फक्त व्हेनेझुएलाच नाही तर जगभरात बाकीच्या देशांमध्येही आर्थिक मंदीच्या झळा बसतायत. इजिप्त, लिबिया, डेमोक्रॅटिक […]

विदेश

पाक मध्ये तेजग्राम एक्सप्रेसला भीषण आग, 16 जणांचा मृत्यू

पाकिस्तान मध्ये तेजग्राम एक्सप्रेसला भीषण आग लागली असून या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाल्याची  माहिती आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेस  गुरुवारी सकाळी रहीम यार खान रेल्वे स्टेशनजवळील लियाकतपूर येथे पोहोचली. त्यावेळी रेल्वेच्या एका डब्यात भीषण आग लागली. ही आग इतकी वेगात पसरली की प्रवाशांना सुटका […]

विदेश

जगातील नंबर एक दहशतवाद्याचा खात्माः डोनाल्ड ट्रम्प

जगातील नंबर एक दहशतवाद्याचा खात्मा झाला असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहिर केले आहे. अमेरिकन लष्कराच्या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबु बक्र अल बगदादीचा खात्मा झाला असल्याचे त्यांंनी सांगितले. अवघे जग इस्लाममय करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या आणि निष्पाप नागरिकांच्या कत्तली करत सुटलेला ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया’ अर्थात आयएस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू […]