महाराष्ट्र

आनंदाची बातमी; महाराष्ट्रातील 19 रुग्ण कोरोनामुक्त

सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पण अशातच नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आतापर्यंत ४,२२८ जणांची Covid-19 ची चाचणी करण्यात आली. त्यात ४,०१७ जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला तर १३५ कोरोना पॉझिटिव्ह […]

महाराष्ट्र

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास सुरु राहणारः मुख्यमंत्री

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन आहे. त्यामुळे नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पण आता नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही कारण जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता 24 तास सुरु राहणार आहेत. गुरुवारी वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली. लॉकडाऊन मुळे लोकांना […]

महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 116 वर

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 116 वर पोहोचली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. मुंबईत एकूण कोरोना रूग्ण 45 कोरोनाबाधित सापडले आहेत. मुंबईत रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. सांगतील एका कुटुंबातील 5 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 116 वर पोहचला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस […]

महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोणा रुग्णाचा चौथा बळी

महाराष्ट्रात आज कोरोणा रुग्णाचा चौथा बळी गेला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेला 65 वर्षीय व्यक्ती नुकताच युएई येथून मुंबईत आला होता. या व्यक्तीला ताप, खोकला आणि श्वसनासाठी त्रास होत असल्याने 23 मार्च रोजी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाला मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचाही त्रास होत होता. जेव्हा त्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात […]

महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोनाचा तिसरा बळी

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज मुंबईत कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. मूळचा फिलिपिन्सचा असलेल्या नागरिकाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 68 वर्षीय फिलिपिन्सचा नागरिकाला 13 मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाचे संसर्ग आढळून आल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु, त्याच्या प्रकृतीत सुधार झाला होता. कस्तुरबामध्ये उपचार घेतल्यानंतर खासगी रुग्णालयात […]

महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच आता महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचा दुसरा बळी गेल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. मुंबईमध्येहे एका 63 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती आता 74 वर पोहोचली आहे. काही तासांमध्ये हे आकडे वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आता संपूर्ण […]

महाराष्ट्र

जनता कर्फ्यूला सगळ्यांनी 100 टक्के प्रतिसाद द्यावाः म्हैसेकर

उद्या होणाऱ्या जनता कर्फ्यूला सगळ्यांनी 100 टक्के प्रतिसाद द्यावा असे आवाहन पुणे विभागीय दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. कोरोनामुळे पुणे शहरात रक्ताचा साठा कमी झाला आहे त्यामुळे आपतकालीन स्थितीत रुग्णांच्या उपचारावर मर्यादा येत आहेत. त्यामुळेच पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी नागरिकांना रक्तदानाचं आवाहन केलं आहे. दीपक म्हैसेकर म्हणाले, “आम्ही रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील […]

महाराष्ट्र

दिलासादायक बातमी: महाराष्ट्रात 5 रुग्णांची कोरोनावर मात

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र महाराष्ट्रातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील 5 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे आणि त्यांना होम क्वारंटाइन राहावं लागणार आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आणखी 3 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. […]

महाराष्ट्र

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून तब्बल 1 लाख रुपयांचा दंड वसूल

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने शहराची स्वच्छता करण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे शहरात थुंकणाऱ्या नागरिकांकडून 1 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी तात्काळ सुरु करण्यात आल्यामुळे काल एका दिवसात तब्बल 1 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. “गर्दीच्या ठिकाणी थुंकल्यानं आजाराचा फैलाव होण्याची शक्यता वाढते. त्यामुळं हे थांबवण्यासाठी […]

महाराष्ट्र

पुण्यातील सर्व परमीट रुम, बार 31 मार्चपर्यंत बंद

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व परमीट रुम, बार आणि रेस्टॉरंट बार सर्व 31 मार्च पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व एफएल 3 (तारांकीत हॉटेल वगळून) अर्थात परमीट रूम, फॉर्म ई/ ई -2/ अर्थात बार […]