कोरोना इम्पॅक्ट पुणे बातमी मुंबई

मुंबई पुण्यासाठी सोमवारपासुन हे असतील नवीन नियम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता महाराष्ट्र अनलॉक होत आहे.अनलॉकचे पाच टप्पे करण्यात आले आहेत.त्या टप्प्याप्रमाणे आता निर्बंध वाढविले आणि कमी जाणार आहेत.प्रत्येक जिल्ह्यांचा  आठवड्याला पॉझिटिव्हिटी दर काढला जाणार आहे. या बरोबरच ऑक्सिजन बेडसची संख्या देखील ठरविली जाणार आहे. पुणे शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण झाल्यामुळे आठवड्यात निर्बंध कमी करण्यात येथील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.पण […]

बातमी महाराष्ट्र मुंबई विदर्भ

वडिलांच्या स्मरणार्थ ओसाड माळरानावर वनराई फुलविण्याची प्रतिज्ञा.

वडिलांना वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही. ही गोष्ट मनाला लागून राहिली आणि वडिलांच्या तेराव्याला त्यांच्या स्मरणार्थ गावात माळावर वड, पिंपळ, गुलमोहर आदी वृक्षांची रोपे लावून वडिलांची रक्षा या झाडांखाली विसर्जित करून वडिलांच्या आठवणी या वृक्षांच्या रूपाने जपल्या. आज जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्तानं आपण आज याच तरुणाची कहाणी वाचणार आहोत. तासगाव तालुक्यातील द्राक्षभूमी शेतकरी संस्थेचे संस्थापक अभिजित […]

इतर बातमी महाराष्ट्र मुंबई वायरल झालं जी

प्रेरणादायक ! त्यानं 22 लाखांची कार विकून ‘अशा’ प्रकारे केली ‘कोरोना’ग्रस्तांची मदत

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं जीव गमावणाऱ्या रुग्णांच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या किंवा वाचल्या असतील. अशात मुंबईत एक देवदूत लोकांच्या मदतीला धावून येताना दिसला. या तरुणानं स्वत:ची कार विकून लोकांना ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. या तरुणाचं नाव शाहनवाज शेख आहे. सध्या त्यानं केलेल्या कामगिरीनं लोक त्याला ऑक्सिजन मॅन म्हणून ओळखू लागले आहेत. लोकांना ऑक्सिजन कसा उपलब्ध होईल यासाठी […]

टेक इट EASY बातमी महाराष्ट्र मुंबई वायरल झालं जी

गर्लफ्रेंडला भेटायला जाऊ का ? असं विचारणाऱ्याला मुंबई पोलिसांचं भन्नाट उत्तर !

सध्या राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. आवश्यक कारणाशिवाय कुणालाही बाहेर फिरण्यास परवानगी नाही. अशात एका ट्विटर युजरनं मात्र मुंबई पोलिसांना प्रश्न केला की, मी गर्लफ्रेंडला भेटायला जाऊ शकतो का. मुंबई पोलिसांनी याला भन्नाट उत्तर दिलं आहे. एका युजरनं मुंबई पोलिसांना टॅग करत ट्विट केलं की, मी बाहेर जाऊन माझ्या गर्लफ्रेंडला भेटू शकतो का. याला […]

इतर कोरोना इम्पॅक्ट बातमी मुंबई

सासूने आई सारखं सांभाळल,शंभरीपार वृद्धेच्या पार्थिवाला सुनेने दिला मुखाग्नी

पालघर जिल्ह्यातील दहिसर येथे एक वेगळीच घटना घडली आहे.ताराबाई गोडांबे यांचे वय वर्ष 100 यांचे काल वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात त्यांच्या सुनेने त्यांना मुखाग्नी दिला.नीता गोडांबे असे त्यांचे नाव आहे.ताराबाई यांच्या पती आणि मुलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते.त्याच्या निधनानंतर त्यांची सून नीता यांनी त्यांचा सांभाळ केला. ताराबाई त्यांच्या सुनेला अगदी मुलीप्रमाणे जीव लावत,त्यामुळे ताराबाईच्या […]

बातमी महाराष्ट्र मुंबई राजकारण

शरद पवार काल रात्री पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात !

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता अशी माहिती समोर आली आहे की, पुन्हा एकदा त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार एका छोट्याशा शस्त्रक्रियेसाठी शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री त्यांची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. […]

काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट महाराष्ट्र मुंबई

कोरोनाचा फटका मुंबईच्या डब्बेवाल्यांना देखील आधी होते 5000 हजार आता उरले फक्त 200…

‘मॅनेजमेंट गुरु’ म्हणून ज्यांना संपूर्ण जगात वेगळी अशी ओळख आहे,असे मुंबईचे डब्बेवाले नेहमी चर्चेत असतात.मुंबई सारख्या मोठ्या शहरात तुमचा डब्बा तुम्हाला अगदी वेळेत आणि गरम भेटत असेल तर तो फक्त आणि फक्त मुंबईच्या डब्बेवाल्यांमुळे.पण मागील वर्षी कोरोना महामारी आली आणि सर्व व्यवसाय ठप्प झाले. अनेकांना वर्क फ्रॉम होम देखील मिळाले.लोकल बंद झाल्या.त्यामुळे डब्बेवाले यांचा व्यवसाय […]

बातमी महाराष्ट्र मुंबई वायरल झालं जी

‘हाफकिनला लसीची परवानगी ठाकरेंच्या पत्रामुळंच मिळाली, याला म्हणतात ठाकरे ब्रँड !’

जास्तीत जास्त लसीकरण व्हावं या दृष्टीकोनातून हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतर पद्धतीनं कोव्हॅक्सिन बनवण्याची मान्यता दिली आहे. परंतु या निर्णयानंतर आता सत्ताधारी शिवसेना आणि मनसे यांच्यात श्रेयवाद सुरू झाला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलं की, राज्य सरकारनं जानेवारीतच हाफकिनला लस उत्पादनाची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्याची परवानगी राज […]

बातमी महाराष्ट्र मुंबई वायरल झालं जी

कोरोना संकटात मुकेश अंबानींचा मदतीचा हात, ऑक्सिजनचा करताहेत मोफत पुरवठा !

देशात कोरोनाचा हाहाकार एवढा वाढला आहे क, आरोग्य सेवाही कमी पडत आहे. ऑक्सिजन वेळेत न मिळाल्यानं अनेक रुग्ण दगावले आहेत. अशात आता प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे मदतीसाठी पुढं आले आहेत. अंबानी यांनी त्यांच्या रिफायनरीत उत्पादित होणारा ऑक्सिजन हॉस्पिटल्सला मोफत देण्यास सुरुवात केली आहे. लाईव्ह हिंदुस्ताननं दिलेल्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे पश्चिम […]

बातमी महाराष्ट्र मुंबई

वाहतूक पोलिसांना शिव्या घालणाऱ्या तरुणांचे झाले,मन परिवर्तन पोलिसांनाच करू लागला सलाम..

मुलुंड वाहतूक पोलिस नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्यांवर कारवाई करत होते.त्यावेळेस जतीन नावाचा एक युवक त्यांची गाडी नो पार्किंगमध्ये लावून उभा होता.त्यावर पोलिसांनी कारवाई केली.चिडलेल्या जतीने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाहतूक पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर वाघ आणि गोरख सानप यांच्या अंगावर तो धावून देखील गेला.अखेर वाहतुक पोलिसांनी मुलुंड पोलिसांना यांची माहिती दिली.पोलिसांनी कारवाई करत जतीनला ताब्यात […]

बातमी मराठवाडा महाराष्ट्र मुंबई राजकारण वायरल झालं जी विदर्भ

स्वीय सहाय्यकाचा जीव वाचवण्यासाठी नितीन गडकरींनी खर्च केले तब्बल 35 लाख !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. नितीन गडकरी यांनी स्वीय्य सहाय्यकाला एअर अॅम्ब्यलन्सनं चेन्नईला नेण्यासाठी रात्रीच्या वेळी बँकेच्या सीईओला फोन करून लॉकर उघडून 35 लाख रुपये काढले. खुद्द नितीन गडकरी यांनीच व्हिडीओद्वारे ही माहिती दिली आहे. काय म्हणाले नितीन गडकरी ? नितीन गडकरींनी सांगितलं की, नागपूरचं काम […]

इतर बातमी महाराष्ट्र मुंबई राजकारण वायरल झालं जी

अजित पवारांचा फडणवीसांना टोला म्हणाले- ‘सरकार बदलणारा अजून जन्माला यायचाय’

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार पाडण्याच्या वक्त्यावरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राज्यातील आघाडी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. सरकार पाडणं हे कुण्या येरा गबाळ्याचं काम नाही असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. बुधवारी (दि 14 एप्रिल) पंढरपूर येथीप प्रचार सभेत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार […]

इतर बातमी महाराष्ट्र मुंबई वायरल झालं जी

पोलिसांच्या मदतीला धावून आले राहुल साळवे आणि त्यांची टीम; वाचवले ३१ दिवसांच्या बाळाचे प्राण !

कस्तुरबा मार्ग पोलिश स्टेशनच्या, मुंबई अंतर्गत आलेल्या एका केस मध्ये पोलिस उपनिरीक्षक राम शेंगडे यांच्या निदर्शनास ३१ दिवसाचे एक बाळ आले. त्यांनी त्या बाळाला त्वरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी हॉस्पिटल, कांदिवली पूर्व इथे पोलीस कॉन्स्टेबल विद्या वांगा यांच्या देखरेखीखाली अॅडमिट केलं. बाळाला अॅडमिट केल्यानंतर उपचारादरम्यान बाळाला ओ निगेटिव्ह सारख्या लवकर उपलब्ध न होणाऱ्या रक्तगटाच्या ५० […]

बातमी महिला विशेष मुंबई राजकारण

अनिल देशमुख आणि मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात जाणाऱ्या जय़श्री पाटील नेमक्या आहेत तरी कोण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता त्यांच्यावरील आरोपाची सीबीआय चौकशी होत असल्यानं त्यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. हायकोर्टानं ज्या याचिकेवर सुनावणी करताना सीबीआय चौकशीचे आदेश दिले ती याचिका अ‍ॅड जयश्री पाटील (सदावर्ते) यांनी दाखल केली होती. याआधीही त्यांनी मराठा आरक्षणाच्या सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. […]

मुंबई यशोगाथा

वेटर ते 80 हून अधिक एन्काऊंटर करणारा धडाकेबाज पोलिस अधिकारी दया नाईक

मुंबई पोलिस हे जगातील एक चांगली पोलिस फोर्स मानली जाते.मुंबई पोलीसमध्ये एकाहून- एक सरस पोलिस अधिकारी आहेत.जे फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध नाहीत तर संपूर्ण देशात त्यांची एक वेगळी ओळख आहे.मुंबई पोलिस दलातील असेच एक चर्चेतले नाव म्हणजे एनकाउंटर स्‍पेशलिस्‍ट दया नाईक होय.दया नाईक यांचे आयुष्य कोणत्याही  चित्रपटाच्या स्टोरीला शोभेल असे आहे.  म्हणून आजपर्यत त्यांच्या […]

बातमी महाराष्ट्र मुंबई राजकारण

जेनेलिया आणि रितेश यांनी मानले महाविकास आघाडीचे आभार…

जेनेलिया आणि रितेश बॉलीवुडमधील सर्वाधिक चर्चेत असणारे कपल आहे. रितेश हा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. त्यामुळे रितेश हा महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा सक्रिय असतो.काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी काल महाराष्ट्राचा अर्थ संकल्प सादर केला. त्यावेळेस अजित दादा यांनी ईस्टर्न फ्री वे ला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची घोषणा केली. […]

बातमी मनोरंजन मुंबई यशोगाथा

आता हाथीराम चौधरी दिसणार नव्या रुपात….जयदीप अहलावत यांना हाथीराम चौधरी बनायला लागले दहा वर्ष…

पाताल लोक २ येणार असल्याची चर्चा असतानाच हाथीराम चौधरी म्हणजेच अभिनेता जयदीप अहलावत यांचे नविन काम आपल्या पाहायला मिळणार आहे. ते ही नेटफिल्कसवर…. पाताल लोक या वेब सिरीज मधून लोकप्रिय झालेले हाथीराम चौधरीची भूमिका साकारणारे अभिनेता जयदीप अहलावत साठी हे पात्र त्यांच्या कारकीर्दीचे मुख्य आकर्षण ठरले. आपल्याला मिळालेल्या प्रत्येक संधीमध्ये त्यांनी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला […]

बातमी मुंबई वायरल झालं जी

अनुराग कश्यप, तापसी पन्नू आणि विकास बहल यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा…

  आयकर विभागाने चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप, तापसी पन्नू आणि विकास बहल यांच्या घरावर छापा टाकला आहे. आयकर विभागाने अनुराग कश्यपचे घर तसेच त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली आहे. असे म्हटले जात आहे की या चित्रपटातील कलाकारांव्यतिरिक्त इतर काही लोकांच्या घरावरही छापा टाकला जाऊ शकतो. वृत्तानुसार कर चुकवल्याच्या प्रकरणात आयकर विभागाने छापा टाकला आहे. फॅंटम फिल्म्स […]

देश मुंबई यशोगाथा

जमशेदजी टाटांच्या झालेल्या अपमानातून उभं राहिलं मुंबईच 5 स्टार ताज हॉटेल…

औद्योगीकृत राष्ट्रांच्या लीगमध्ये भारताला स्थान मिळवून देण्यास महत्वपूर्ण काम करणाऱ्या उद्योजकांमध्ये जमशेतजी टाटा यांचे नाव प्रथम येते. ते एक देशभक्त आणि मानवतावादी होते. भारताला जगातील महान राष्ट्रांमध्ये स्थान मिळावे यासाठी ते उत्साही होते. या उद्देशाने, त्यांनी उत्कटतेने भारतासाठी स्वप्ने पाहिली, त्यापैकी फक्त एकच त्यांचा आयुष्यभरात पूर्ण झाले. ते म्हणजे – हॉटेल बॉम्बे. देशाचा अभिमान असणार […]

इतिहास मनोरंजन मुंबई

मुंबईचा डॉन हाजी मस्तानला खुप आवडायची मधुबाला आणि म्हणून त्याने…..

तस्कर हाजी मस्तानने मुंबईचा पहिला डॉन होण्याचा मान मिळविला ते ही बंदूक हातात न घेता. यासाठी तो इतर गुंडांचा सहारा घेत असे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मधुबालाचा चाहता असणाऱ्या मस्तानवर सिनेमे बनवण्याचा मोह बॉलिवुडला पण आवरला नाही. मस्तान हैदर मिर्झाचे पूर्ण नाव आकीब हुसेन असे होते जो नंतर हज प्रवासानंतर हाजी मस्तान म्हणून ओळखला जाऊ लागला. […]

देश ब्लॉग मुंबई यशोगाथा

IIT मुंबईमध्ये मिळाले सीट सोडून दुसरीकडे प्रवेश घेणारे मुकेश अंबानी या काही कारणांमुळे आहेत आजही टॉपला…

भारतातील सर्वात श्रीमंत माणूस आणि व्यवसायिक मुकेश अंबानी यांच्या बद्दल जाणून घेण्यायला तर सगळ्यांनाच आवडेल. जगभरात नाव कमावलेले अंबानी यांच्या विषयीच्या कमी ज्ञात असलेल्या अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल! मुकेश अंबानी यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी येमेनमधील अदेन येथे झाला होता.  मुकेश म्हणतात की केमिकल इंजिनिअरिंग करण्याची  इच्छा ‘द ग्रेजुएट’ चित्रपटाद्वारे […]

इतर बातमी मुंबई वायरल झालं जी

‘कारभारी लयभारी’ या मालिकेमधील अभिनेत्रीवर हल्ला; सोशल मिडियावर शेअर केला व्हिडिओ…

झी मराठी वरील ‘कारभारी लयभारी’ या मालिके मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीवर काही अज्ञात माणसांनी अचानक हल्ला केला आणि तिला मारहाण केल्याच समोर आलं आहे. कारभारी लयभारी मधील ‘गंगा’ हे पात्र करणाऱ्या या अभिनेत्री नी स्वतः हे एका व्हिडिओद्वारे सोशल मिडियावर शेअर केले आहे. गंगा ही भूमिका करणारी ही अभिनेत्री ट्रान्सजेंडर आहे. त्यांचे नाव प्रविण हाटे […]

मनोरंजन महाराष्ट्र महिला विशेष मुंबई

नवऱ्याने ५०० रुपयांसाठी विकल्यानंतर गंगूबाई बनली कोठेवाली गँगस्टर…

‘गंगूबाई कोठेवाली’ हे नाव सध्या जोरात चर्चेत आहे ते आलिया भट्ट ने नुकताच संजय लीला भन्साळींच्या वाढदिवसाच्या निमित्त टाकलेल्या ‘गंगूबाई काठिवाडी’ या चित्रपटाच्या ट्रेलर मुळे. हा चित्रपट मुंबईच्या कुख्यात रेड लाईट एरिया असलेल्या कामठीपुरा येथील वेश्यालयातील प्रसिद्ध मॅडमच्या जीवनावर आधारित आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ असे या चित्रपटाचे नाव असून आलिया गंगूबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला […]

ब्लॉग मनोरंजन महाराष्ट्र महिला विशेष मुंबई राजकारण विदर्भ

तुम्हाला माहित आहे का??? अमृता फडवणीस यांचा ‘सुरेल’ प्रवास…

भारतीय राजकारण्यांच्या पत्नी सामान्यत: राजकीय कार्यक्रमांमध्ये साड्या परिधान करतात, आपल्या पतीच्या पाहुण्यांचे व आपल्या पतीच्या मतदार संघाचे व्यवस्थापन करतात, परंतु यापेक्षा पुढे जाऊन काहीतरी नविन करण्यात यशस्वी ठरल्या त्या अमृता फडणवीस. इतर राजकीय नेत्यांच्या पत्नींच्या रस्त्यावर न चालता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांनी रूढी मोडत काढल्या. अमृता यांनी नागपूरच्या वाणिज्य पदवीधर असून […]

इतर महाराष्ट्र मुंबई वायरल झालं जी व्हिडिओ

फ्लाईंग डोसा : येथे डोसा हवेत फिरवून मग डिश मध्ये येतो…

मुंबई मधील एका डोसा विक्रेत्यांचा व्हिडिओ सध्या फेसबुक वर चांगलाच वायरल होतोय. हा डोसा विक्रेता त्याच्या अनोख्या डोसा बनवण्याच्या पद्धतीमुळे फेमस होत आहे. त्याच्या व्हिडिओला एकूण ८४ मिलियन्स च्या पुढे ही व्हूवज् (view) मिळाले आहेत. दक्षिण मुंबईच्या मंगलदास मार्केटमधील श्री बालाजी डोसा येथे डोसा थेट तव्यावरून उडत प्लेटवर जातो. ‘स्ट्रीट फूड रेसिपी’ नावाच्या एका फेसबुक […]

मनोरंजन महाराष्ट्र मुंबई राजकारण

नाहीतर शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून दादा कोंडके विराजमान झाले असते…

राजकारण हे सर्व समावेश आहे अस म्हटलं तरी वावग ठरणार नाही तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले असाल तरी तुम्ही जर राजकारणात यायचं ठरवलं तर राजकारण काही तुम्हा ला नको म्हणणार नाही. येथे अनेक खेळाडू, गायक, डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनिअर, याच बरोबर सिनेसृष्टी मधील कलाकार सुद्धा राजकारणाचे क्षेत्र अजमावून बघतात. यात काहींना खूप यश येते तर काहींचे असलेले […]

ब्लॉग मनोरंजन महाराष्ट्र मुंबई यशोगाथा

पानपट्टीची टपरी टाकण्यापासून ते सुप्रसिद्ध विनोदवीर होण्यापर्यंतचा प्रवास सहजसोप्पा कधीच नव्हता…

हिंदी सिनेसृष्टी मध्ये कॉमेडीला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले ते कॉमेडी चित्रपटांनी….. तेथे कलाकारांना कॉमेडियन म्हणून हिणवले जाते. हिंदी मध्ये कॉमेडियन हा सुपरस्टार किंवा स्टार ही मानला जातो कि नाही हे अलाहिदा ! पण याच्या उलट मराठी सिनेसृष्टी मध्ये कॉमेडीचा आणि कॉमेडियन चा दर्जा कितीतरी पटीने उच्च आहे. ह्या सगळ्यात मोलाचा वाट आहे तो आपल्या मराठी […]

मुंबई वायरल झालं जी

अजूनही मधुबालाच्या नावे दिला जातो गुरुद्वारात लंगर…

बॉलीवुड ची सौंदयवती मधुबाला हीची कारकीर्द त्सगळ्यांना लक्षात रहावी अशीच आहे. पण ही सुपस्टार असणारी अभिनेत्री सगळ्यांना आठवते ते ती तिच्या अल्पाशा आयुष्यामुळे…..! तिच्या बाबतीतल्या बऱ्याच गोष्टींबद्दल जाणून घेण्याची इच्छा सिनेरसिकांना असते. कमी लोक प्रसारित असलेली अशी ही एक मधुबाला विषयीची बाब…. अभिनेत्री मधुबाला यांचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला होता, परंतु गुरुनानक देव यांच्याबद्दल […]

बातमी मुंबई वायरल झालं जी

आणि भाऊने सरपंचपदाच्या शपथ ग्रहणासाठी डायरेक्ट हेलिकॉप्टरने एंट्री घेतली…

तो आला त्याने पाहिलं….आणि….जिंकलं सुध्दा! एकदम फिल्मी स्टाईल वाटेल अशी एंट्री एका सरपंचाने आपल्या शपथ ग्रहण सभारंभासाठी घेतली. पाहणाऱ्यांना जणू काही ती सिनेमातल्या हिरोचीच ग्रान्ड एंट्री वाटली….नक्की काय आहे हा फिल्मी मामला…..नक्की कोण आहे हा हिरोसारखी एंट्री घेणारा सरपंच जाणून घेऊया….. अहमदनगर जिल्हातील संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावातली ही नुकतीच घडलेली ही गोष्ट. गावातील सरपंच […]

क्रीडा देश ब्लॉग महाराष्ट्र मुंबई

अपमानाचा बदला म्हणून नागपूरच्या शेषरावांनी मुंबईत वानखेडे स्टेडियम उभारलं…

India!! India!! India!! India!! सचिन!!सचिन!!सचिन!!सचिन!! असा आवाज दणदणू लागला की सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर उभा रहतो तो क्रिकेटचा वानखेडेवर रंगलेला सामना…… क्रिकेट म्हणायला गेला तर सगळया जगासाठी हा फक्त एक सामान्य खेळ आहे. पण भारतीयांसाठी क्रिकेट हा फक्त एक खेळ नसून जगायला लागणारा ऑक्सिजनच आहे अस म्हटलं तर अतिशयोक्ति होणार नाही. क्रिकेट हा गोऱ्यांचा खेळ […]

इतर बातमी मनोरंजन महिला विशेष मुंबई व्हिडिओ

‘धनंजय माने इथेच राहतात’ नावाच्या नाटकातून स्वानंदी बेर्डे करणार नाट्यक्षेत्रात प्रदार्पण…

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटोशूटचे व इतरही ब-याच पोस्ट ती शेअर करत असते. व यामुळे नेहमीच ती चर्चेत देखील असते. यावेळी सुध्दा ती चर्चेत आली आहे ती तिच्या इन्स्टाग्राम वरील पोस्ट मुळेच…..नुकतेच तिने इन्स्टाग्राम लाइव्ह वरून एक नवीन मोठी घोषणा […]

बातमी महाराष्ट्र मुंबई राजकारण

मा. राज्यपालांना ठाकरे सरकारने दिले नाही विमान? फासे उलटे तर फिरले नाही ना..??

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने मुंबईहून उत्तराखंडला जाण्यासाठी सरकारी विमान राज्यपालांना देण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शुक्रवारी, १२ फेब्रुवारी रोजी मसूरी येथील लाल बहादुर शास्त्री आयएएस अकादमीच्या कार्यक्रमात येणार होते. यामुळे ते गुरुवारी सकाळी दहा वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर […]

महाराष्ट्र मुंबई

वाशी ब्रिजवरून आत्महत्या करणाऱ्या महाभागांचे जीव वाचवणारा ‘राजाराम’ नावाचा अवलिया..

मुंबईतल्या वाशी ब्रिज हा असा पूल आहे जिथे लोकं आत्महत्या करायला येतात, हे ऐकुन अंगावर काटा आला ना? हो इथे आत्महत्या करायला येणाऱ्या लोकांची संख्या हि दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बदलत्या काळानुसार हा पूल ‘सुसाईड हॉटस्पॉट’ बनला आहे. हि संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि आपत्कालीन विभाग देखील कमी पडतो आहे. पण त्यांच्या मदतीसाठी एक व्यक्ती […]

ब्लॉग मुंबई यशोगाथा लाइफफंडा वायरल झालं जी

फक्त भाषणे देऊन बदल होत नसतो त्यासाठी मैदानात उतरावं लागतं ..आणि मल्हार ने ते करून दाखवलं!

फक्त भलीमोठी भाषणे देऊन बदल घडत नाहीत तर त्यासाठी ग्राउंड वर उतरणे महत्त्वाचे असते हे आजकालच्या तरुण पिढीने ओळखले आहे. अलीकडे तरुण पिढी या स्वच्छतेच्या मोहिमेत आवर्जून भाग घेत आहे. त्यांच्यामध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण होत आहे. हे हे जितकं आपल्याला ऐकायला सकारात्मक वाटत आहे प्रत्यक्ष चित्रदेखील तितकेच प्रेरणादायी आहे. त्याचे एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे मुंबईचा […]

Untold Talkies इतिहास पुणे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांच्या ‘त्या’ गनिमी काव्यामुळे ‘घाशीराम कोतवाल’ पोहचले बर्लिनला…

शरद पवारांच्या राजकीय खेळीबद्दल अवघा महाराष्ट्र जाणून आहे. पवारांच्या राजकीय डावपेचाचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. मात्र ‘हा’ किस्सा राजकीय नसून कला क्षेत्रातील आहे. वादात सापडलेल्या एका नाटकाच्या कलाकारांना सुरक्षितरित्या जर्मनीला पाठवण्यासाठी पवारांनी एक ‘खेळी’ खेळली आणि  सगळा महाराष्ट्र चकित झाला. या ‘गनिमी काव्याची’ चर्चा आजही राजकीय आणि कलाकारांच्या वर्तुळात होते. तर प्रकरण असे होते कि, […]