देश विदेश

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ब्रिटनला मोठा धक्का बसला आहे. बोरिस जॉन्सन यांनी ट्विट करत स्वत: आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, “गेल्या २४ तासांपासून मला काही हलकी लक्षणं जाणवत होती. तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. […]

देश

गोरगरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटी; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

देशातील गोरगरीबांसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोठी घोषणा केली आहे. गोरगरिब आणि कामगारांसाठी 1 लाख 70 हजार कोटींची मदत त्यांनी जाहीर केली आहे. तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचा आरोग्य विमा जाहीर केला आहे. देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. […]

देश

कोरोना विरुध्दचे युध्द 21 दिवसांमध्ये जिंकायचे आहेः पंतप्रधान मोदी

“महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकले गेले होते. आज करोनाविरोधातील युद्ध संपूर्ण देशात लढले जात आहे. यासाठी २१ दिवस लागणार आहेत. आपला प्रयत्न आहे की हे युद्ध आपण २१ दिवसांतच जिंकायचं आहे. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान  मोदी यांनी मंगळवारी देशभरात लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर आज (बुधवारी) पहिल्यांदाच आपला मतदारसंघ असलेल्या […]

देश

मोदी सरकारने WHO च्या सुचनांकडे केले दुर्लंक्ष; राहुल गांधींचा आरोप

कोरोनाशी लढा देण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेल्या उपकरणांचा साठा करुन ठेवा, असा सल्ला तीन दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत 19 मार्चपर्यंत वेंटिलेटर, सर्जिकल मास्क आदी उपकरणांच्या निर्यातीची परवानगी कशी दिली? असा सवाल कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. ही फसवणूक कोणत्या अटींवर करण्यात आली? हा गुन्हेगारी […]

देश

जनता कर्फ्यूला देशभरातून सुरुवात; नागरिकांचा चांगला प्रतिसाद

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी भारतात आज जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. या कर्फ्यूला पहाटे सुरूवात झाली असून मोदी यांनी पुन्हा एकदा यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन ट्विटरवरून केलं आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील प्रवाशांचा भार वाहणारी दिल्ली मेट्रो दिवसभरासाठी बंद करण्यात आलेली आहे. मेट्रो प्रशासनानं यासंदर्भात ट्विट […]

देश

कोरोना रुग्णांची संख्या भारतात 298 वर

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाची संख्या 258 वरुन 298 वर पोहोचली आहे तर राज्यात 63 रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. दिवसेंदिवस कोरोनाव्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतो आहे. शुक्रवारी कोरोनाव्हायरसचे 50 रुग्ण आढळले होते. मात्र शनिवारी तब्बल 98 रुग्ण आढळलेत. फक्त 24 तासांतच रुग्णाची संख्या दुप्पट झाली आहे. उद्या म्हणजेच रविवारी […]

देश

निर्भयाला अखेर न्याय ! चारही नराधमांना लटकवले फासावर

दिल्ली निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना आज सकाळी 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आले आहे. निर्भयाला अखेर 7 वर्षानंतर न्याय मिळाला आहे. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी या आरोपींची नावं आहेत. आजचा दिवस निर्भायाचा आहे. संपूर्ण देश हा दिवस विसरणार नाही. उशिरा का होईना निर्भयाला अखेर […]

देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशातील संबोधित करणार आहे. देशात कोरोनाची संख्या वाढत चालली आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहे. पंतप्रधान रात्री देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजनही केलं होतं. या बैठकीत कोरोनाचा सामना करण्यासाठी […]

देश

भारतात कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची लागण

भारतात कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच कोरोनाची लागण झाली आहे. या डॉक्टरांनी कर्नाटकमधील कलबुर्गी येथील कोरोना रुग्णावर उपचार केले होते. या रुग्णाचा नुकताच कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. “उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांना कुटुंबासोबत त्यांच्या घरात बंदिस्त ठेवण्यात आलं आहे. त्यांना लवकरच विलगीकरण कक्षात ठेवलं जाणार,” असल्याची माहिती कलबुर्गीचे उपायुक्त शरत बी यांनी […]

देश

‘काश्मीरचे राज्यपाल तर सतत दारु पित बसतात’

काश्मीरच्या राज्यपालांना काही काम नसतं ते सतत दारु पित बसलेले असतात असं वादग्रस्त वक्तव्य गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले आहे. उत्तर प्रदेशातील बागपत येथे रविवारी एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मलिक म्हणाले, “राज्यपालांना काहीच काम नसतं. काश्मीरमध्ये जे राज्यपाल असतात ते तर नेहमी दारु ढोसत बसतात आणि गोल्फ खेळतात. इतर ठिकाणचे […]