राजकारण

मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नकाः राज ठाकरे

मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे. रंगशारदा येथे आज मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र बैठक सुरू झाल्यानंतर केवळ 10 मिनिटांतच राज ठाकरे बैठकीतून बाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदराने ‘हिंदूहृदयसम्राट’ असं संबोधलं […]

राजकारण

बाळासाहेबांचे हिंदुत्व पेलणे येरागबाळ्याचे काम नाही; शिवसेनेच्या मुखपत्रातून राज ठाकरेंवर टीका

‘वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही. तरीही या देशात कुणी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी नवी घडी बसवत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची दिलदारी आमच्याकडे आहेच. विचार ‘उसना’ असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा!’ अशा शब्दात शिवसेनेकडून राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईत मनसेचे […]

राजकारण

भीमा-कोरेगाव दंगलीमागे फडणवीस सरकारचे षडयंत्र; शरद पवारांचा आरोप

भीमा-कोरेगाव दंगलीमागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात हा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे कोरेगाव-भीमा प्रकरणाची कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली […]

राजकारण

अमित राज ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश; मनसेच्या नेतेपदी निवड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच महाअधिवेशन आज सुरु आहे. या महाअधिवेशनात आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करत असल्याची घोषणा केली. 14 वर्षांनंतर मनसेचा महाअधिवेशन मेळावा होत आहे. या […]

राजकारण

मुंबईत ‘या’ तारखेपासून सुरु होणार ‘नाईट लाईफ’; मंत्रिमंडळाने दिली मान्यता

मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरु करण्याला राज्य सरकारकडून तत्वतः मंजूरी देण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारपरिषदेत केली आहे. ‘मुंबईचा महसूल वाढण्यासाठी आम्ही 2013 मध्ये ही नाईट लाईफची संकल्पना मांडली होती. आता सात वर्षानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात येत आहे. यामुळे रोजगारात वाढ होणार आहे. 27 जानेवारीपासून नाईट लाईफबाबतचा […]

राजकारण

मोदींची पुन्हा शिवाजी महाराजांशी तुलना; सोशल मीडियावर तीव्र संताप

सध्या बॉक्स ऑफीसवर ‘तानाजीः द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट चांगलाच गल्ला कमावित आहे. या चित्रपटाचा एक प्रोमो आहे. या प्रोमोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा तर तानाजी मालुसरे यांच्या जागी अमित शहांचा चेहरा दाखविण्यात आला आहे. ‘पॉलिटिकल किडा’ या ट्विटर हॅंडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार पाहून […]

राजकारण

‘शरद पवार आणि अजित पवारांमुळे धनुभाऊ लक्षात आला’

शरद पवार आणि अजित पवार यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे धनुभाऊ लक्षात आला नाहीतर दिसलाही नसता असे भावनिक मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले  आहे. रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या आभार मेळाव्यात धनंजय मुंडे बोलत होते. पाच वर्षांपूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांनी माझ्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली नसती, तर कदाचित हा भाऊ तुम्हाला लक्षात […]

राजकारण

‘नाईट लाईफ’च्या निर्णयाचे रोहित पवारांनी केले कौतुक

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘मुंबई नाईट लाईफ’चा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची 26 जानेवारीपासून अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट द्वारे स्वागत केले आहे. ‘मुंबईमध्ये ‘नाईट लाईफ’ला परवानगी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आणि याचं संपूर्ण श्रेय माझे मित्र आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना जातं. यामुळे मुंबईमध्ये वडापावच्या […]

राजकारण

रोहित पवारांनी लावला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन अन् म्हणाले…..

संगमनेर येथे आज युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे युवकांना आज मनोरंजनाची एक वेगळीच मेजवानी अनुभवायला मिळाली. या महोत्सवात विविध पक्षांच्या तरुण आमदारांची मुलाखत प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी घेतली. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आमदार आदिती तटकरे, काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी यांनी एकाच मंचावर हजेरी लावली […]

राजकारण

‘अनेकांना वाटतं होत मी निवृत्त होईल, पण जनतेनं तसं होऊ दिलं नाही’

“अनेकांना वाटत होतं की, मी निवृत्त होईल. पण तसं घडलं नाही. महाराष्ट्रातील जनतेनं तसं घडू दिलं नाही,” असं म्हणत  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाच्या नेत्यांना टोला लगावला आहे. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता आमिर खान, […]