मनोरंजन

२०२० मध्ये  चित्रपटसृष्टीतील या दिग्ग्ज कलाकारांनी घेतला जगाचा निरोप 

मुंबई  :   बॉलिवूडमधील  अनेक  लाकारांनी 2020 मध्ये या जगाला निरोप दिला. यातील अनेकांचा मृत्यू हा वृद्धापकाळाने झाला, तर काहींचा मृत्यू विविध आजारांमुळे झाला. तसेच काही कलाकांरांनी आत्महत्या करून स्वत: चे जीवन संपवले. यावर्षी कोरोना साथीच्या काळात अनेक चाहत्यांनी जुन्या आणि नवीन कलाकारांना श्रद्धांजली वाहिली. देशातील कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी 25 मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्याच दिवशी अभिनेत्री निम्मी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ती 88 वर्षांची होती आणि तिचे खरे नाव नवाब बानो असे होते. 1950-60 च्या दशकात त्यांनी ‘आन’, ‘बरसात’ आणि ‘दीदार’ या चित्रपटांत काम केले होते.

याशिवाय प्रसिद्ध कलाकार इरफान खान यांचे 29 एप्रिल रोजी कर्करोगाने निधन झाले. इरफानच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. कारण, प्रेक्षक त्याच्या रिकव्हरीची आतुरतेने वाट पाहत होते. अवघ्या 54 व्या वर्षी, ‘द लंचबॉक्स’, ‘लाइफ ऑफ पाई’ आणि ‘द नेमसेक’ या चित्रपटातून प्रसिद्ध मिळवलेल्या अभिनेत्याने संपूर्ण जगाचा निरोप घेतला.

दरम्यान, इरफान खान च्या निधनाच्या बातमीमुळे चाहते सावरले नाही, तरचं अभिनेता ऋषी कपूर यांच्या मृत्यूची बातमी आली. ऋषी कपूर यांचा मृत्यूदेखील कर्करोगामुळे झाला. ते 67 वर्षांचे होते. ‘बॉबी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्याने अलिकडच्या काळात ‘मुल्क’ आणि ‘दो दूनी चार’ सारख्या वेगवेगळ्या थीम असलेल्या चित्रपटांमध्ये काम केले होते

हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ चित्रपटासाठी ‘जिंदगी कैसी है पहाली’ आणि ‘कहीं दूर जब दिन ढल जाए’ सारखी गाणी लिहिणारे गीतकार योगेश यांचे 29 मे रोजी निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. रजनीगंधा, ‘बातों बातों में’ आणि ‘चितचोर’ या चित्रपटाद्वारे भारताच्या मध्यमवर्गाची रोजची कहाणी पडद्यावर आणणारे बासु चटर्जी यांचे निधन 4 जून रोजी झाले. ते 93 वर्षांचे होते. योगासच्या निधनानंतर पाच दिवसांनी बासु यांचे निधन झाले. योगेश यांच्या निधनानंतर पाच दिवसांनी बासु यांचा मृत्यू झाला होता.

बॉलिवूडसाठी आणखी एक अत्यंत धक्कादायक बातमी 14 जून रोजी आली. ‘एम एस धोनी: द अन्टोल्ड स्टोरी’ चा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या अकाली मृत्यूने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर सुशांतच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सीबीआय तपास सुरू करण्यात आला. सीबीआयने अमली पदार्थ प्रकरणी दीपिका पादुकोण यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *