बातमी महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या 29 जुलै पूरग्रस्त कोल्हापूर भागांचा दौरा करणार आहेत.कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपले आहे.त्यामुळे एकच हाहाकार माजला आहे.महापुरामुळे अनेक जिल्हयाचं मोठं नुकसान झालं आहे.मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी तळीये गावाचा दौरा केला होता.त्यानंतर आता मुख्यमंत्री कोल्हापूरचा दौरा करणार आहेत.कोल्हापूर,शिरोळ या भागांना भेट देणार आहेत.नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कोल्हापूर,सातारा दौरा केला आहे.

अजित पवार यांच्या नंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या भागास भेट देणार  आहेत.महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीच मोठं नुकसान झालं आहे,तब्बल 66 कोटीचं नुकसान झाले आहे.पुरामुळे 58 हजार 500 हेक्टर जमिनीवरील पिके ही बाधित झाली आहेत.करवीर,शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. ऊस, भात, सोयाबीन भुईमूग पिकांना सर्वाधिक नुकसान झालं आहे.

शेतातील पाणी कमी झाल्यानंतरच पंचनामे केले जाणार आहेत.कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.भराव वाहून गेल्यामुळे पुढील काही दिवस रेल्वे सेवा बंद राहणार आहे.एक किलोमीटरचा भराव वाहून गेला आहे.पुलाचे स्ट्रक्टचरल ऑडिट झाल्यानंतर सेवा सुरळीत होणार आहे.मुख्यमंत्री उद्या हा दौरा करणर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *