इतर

नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत- भास्कर जाधव

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र आमदार नितेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात.त्यामुळे अनेक वाद देखील होतात.यावारूनच शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केले आहे.नारायण राणें यांच्या मुलांसारखी मुले महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत.असं मोदी यांनी म्हटलं आहे.नारायण राणेंना मी सल्ला देऊन काही फायदा नाही कारण त्यांची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर अशी मुले कोणाच्या पोटाला जन्माला येऊ नयेत.महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये, थोरामोठ्यांचा आदर करणाऱ्या राज्यामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात मतमतांतर वेगळी असू शकतात. पण आपण कोणती भाषा कोणाबद्दल वापरत आहोत याचं अजिबात भान नाही.नारायण राणे यांचा शिवसेना वाढीमध्ये काडीचा हातभार नाही.त्यांनी स्वताभोवती वलय निर्माण केले आहे.शिवसेना सोडल्या पासून त्यांनी सेनेला शिव्या देऊन स्वताचे अस्तित्व निर्माण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *