ब्लॉग महाराष्ट्र यशोगाथा

सगळ्या कॉलेजसमोर एक कानाखाली बसल्यावर कॉलेजचा ‘भाई’, जिद्दीने पेटून PSI अधिकारी होतो….

नेहमीच प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्यामुळे आपले आयुष्यच बदलून जाते. असेच काहीसे घडले एका सर्वसामान्य कुटुंबात राहणाऱ्या विजय नाचण यांच्या बरोबर….
लहानपणापासूनच बंडखोर असणारे विजय हे गावात कॉलेज मध्ये भाई / दादा म्हणूनच ओळखले जायचे. पण असे काय घडले त्यांच्या आयुष्यात की भाईगिरी करणारा हा तरुण आज एक पी.एस. आय अधिकारी म्हणून महाराष्ट्र पोलिसात कार्यरत आहे..

आपला स्वतःच व्यक्तिमत्व पार बदलून टाकून भाईगिरी सोडून देऊन विजय हे आज लोकसेवेत रुजू झालेत. हा त्यांच्या आयुष्याचा प्रवास सुरु होतो तो औरंगाबाद मधील गावातून. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले विजय नाचण यांच्या आईला कायम वाटायचे की त्यांनी मोठे होऊन अधिकारी बनावं. पण शाळेत कॉलेजमधील विजय यांचे वागणे काही त्या मार्गाने जाताना दिसत नव्हते. बारावी नापास होऊन ती परत दिल्यावर मुलाने खूप शिकावे यासाठी विजय यांच्या आईनी त्यांना गावा पासून लांब औरंगाबाद शहरात त्यांना शिक्षणासाठी पाठवले. पण तिथे जाऊन ही विजय राजकारणाच्या मागे लागले. ते आता कॉलेजचे भाई म्हणून ओळखले जात. भाईगिरी करणारा विजय आता वाया जातोय असे वाटनाच अशी एक घटना घडली कि त्यांचं सगळं आयुष्यच पार बदलून गेले.

ते म्हणतात, कॉलेज मध्ये मला भाई म्हणून ओळखले जायचे। मला ते आवडायला लागलेल. यातूनच पुढे बरेच किस्से झाले भांडण झाली. मग त्यामुळे मला एकदा पोलीस स्टेशन ला जाव लागलं. यासाठी आई वडील खुप बोलले. मुलगा वाया गेला असे त्यांना वाटले. माझी बहिणी बारावीला असताना तिचा नंबर माझ्याच कॉलेज मध्ये लागला. पण तिथे त्यावेळी झालेल्या घटनेने सगळेच बदलून गेले. मला काही ही कारण नसताना एका पी.एस.आय.ने कानाखाली मारलेली तेव्हा डोक्यातच सणक गेली आणि म्हणून ठरवलं आता पी.एस.आय व्हायचच. मग गाव सोडलं आणि ध्येयाच्या मार्गाला लागलो. गावात सगळ्यांनी माझी खिल्ली उडवली. पण मी माझे ध्येय पूर्ण करण्याची वाट कधीच सोडली नाही. त्याच वाटेवर चालताना बरच अपयश आल पण निश्चय ठाम होता. कारण काही ही झाले तरी मागे वळून पाहायचे नव्हते. खूप अभ्यास केला पण काही हवा तास रिजल्ट लागला नाही. मित्र पास होत होते. पण माझ काहीच होत न्हवतं. आता काय होणार ते कळेना. गावाकडे तर जायचं नव्हता. मग परत जोमाने अभ्यासाला लागलो आणि 2017 मध्ये प्रिलियमन्स पास झालो. यामुळे कॉन्फिडन्स वाढला. मग मेन्स ची तयारी केली आणि त्याचा पण रिजल्ट चांगला लागला. आता टेंशन होत ते फिजिकल आणि मुलाखतीच…
फिजिकल थोडी नीट नाही गेली असे वाटले पण मुलाखत छान गेली. आणि अखेर तो दिवस उजाडला…रिजल्ट चा! जेवतानाच मित्राचा फोन आला. की मी पास झालो होतो. मी पी.एस.आय झालेलो.

याचा सर्वात जास्त आनंद तेव्हा झाला जेव्हा मी पी.एस.आय अधिकारी होऊन माझ्या गावात गेलो. आता मी गावकऱ्यांसाठी कोणता भाईगिरी करणारा दादा नव्हतो तर एक अधिकारी होतो. मी माझे धेय्य साध्य केलं होत. माझ्या कॉलेज मध्ये जिथे माझी भाई म्हणून दहशद होती तेथे माझा सत्कार झाला होता.

आज PSI विजय नाचण हे कित्येक तरूणांसाठी एक प्रेरणा आहेत. त्यांच्या मते, धेय्य प्राप्त करायच असेल तर कष्ट हे घेतलेच पाहिजेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *