लाइफफंडा

 तास न तास खुर्चीत बसून काम करताय ? मग हे वाचाच 

अनेक जण तास न तास खुर्चीत बसून काम करत असतात. किंवा काही कोलेजची, शाळकरी मुले खुर्चीवर बसून अनेक वेळ गेमही खेळत असतात. परंतु ऑफिसमध्ये सतत एकाच खुर्चीवर, जागेवर बसणं शरीरासाठी नुकसानकारक आहे. अशाप्रकारच्या बसण्यामुळे त्याचा आरोग्यावर नकारात्मक, विपरीत परिणाम होत असतो. सतत टिव्ही पाहणं, कंप्यूटर, स्मार्टफोनवर पाहतं राहणंदेखील शरीराला नुकसान पोहचवत असतं.

 

अमेरिकेत झालेल्या एका संशोधनानुसार एक जागेवर बसून राहणे हे धुम्रपानाइतकेच घातक आहे, असे सांगण्यात आले आहे. अमेरिकेतील मेयो येथील एका क्लीनिकमधून सदर विषयावर संशोधन झाले.

खांदे, पाठ, कंबरदुखीच्या समस्येपासून ते अगदी टाइप-2च्या डायबिटीज, हृदयरोग, कॅन्सर यांसारख्या आजारांपासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी चालण्या-फिरण्याचा, व्यायाम करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. दिवसभर बसण्याची किंवा पडून राहण्याची सवय स्मरणशक्तीसाठी घातक असल्याचीही शक्यता संशोधनातून वर्तवण्यात आली आहे.

त्यावर हे आहेत उपाय :-

ऑफिसमध्ये पाण्याची बाटली भरुन न ठेवता, तहान लागल्यास जागेवरुन उठून पाणी प्यावे.
ऑफिसमध्ये शक्य असल्यास आपल्या जागेवरच किंवा दुसऱ्या ठिकाणी स्ट्रेचिंग करावे.
नाश्ता किंवा जेवणासाठी शक्यतो कॅन्टिनमध्ये जावे. जागेवरच खाऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *