बातमी मराठवाडा वायरल झालं जी विदर्भ

भाजप आमदाराला धमकी देताना शिवेसना आमदाराचं वादग्रस्त विधान !

बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची भाजप आमदारावर टीका करताना जीभ घसरली आहे. भाजपचा संजय कुटे सारखा चिनपाट आमदार दिवसभर दारू पिऊन वावरात पडलेला असतो. माझा पुतळा काय जाळतो. हिंमत असेल तर माझ्यासमोर येऊन दाखव मग मी काय आहे हे दाखवतो अशी धमकीच गायकवाड यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी एक वादग्रस्त विधानही केलं आहे. त्यांनी आधी देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली होती. याला फडणवीसांनीही उत्तर दिलं होतं.

संजय गायकवाड यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात ते म्हणत आहेत की, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-महाविकास आघाडीचं सरकार आहे. म्हणून केंद्राकडून रेमडेसिव्हीर, ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. मी फक्त यावर वस्तुस्थिती मांडली तर माझा पुतळा जाळण्यात आला. पण माझा यात दोष काय ? राज्यात मुख्यमंत्री आपला नाही म्हणून अडवणूक करता असा सवालही त्यांनी केला आहे.

पुढं बोलताना गायकवाड म्हणाले, संजय कुटेसारखा आमदार दारू पिऊन वावरात पडलेला असतो. तो मवाली आहे. तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर 50 मीटर माझ्या जवळ यऊन दाखव. तुला संजय गायकवाड काय आहे ते दाखवतो अशी धमकी देत त्यांनी वादग्रस्त विधान केलं. लोक मरत आहेत आणि तुम्ही आंदोलन करताय ? असा सवालही त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *