बातमी महाराष्ट्र राजकारण

बापलेकाने दंड थोपटले,राज पुण्यात तर अमित नाशिकमध्ये

मनसे नेते अमित राज ठाकरे आज पासून नाशिक दौऱ्यावर आहेत.आज दुपार पर्यत ते नाशिकमध्ये पोहोचणार आहोत.आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आढावा घेणार आहेत.दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज देखील पुण्यात आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरू झाली आहे.राज आणि अमित यांचा नाशिक आणि पुण्याचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून अमित स्वताच्या पक्षांमध्ये चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत.पक्षांतील नेते – कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या भेटी घेत आहेत.

अमित यांनी देखील काही दिवसांपूर्वी नाशिक दौरा केला होता,आता पुन्हा ते नाशिक दौऱ्यावर आहेत.असे देखील म्हटले जात आहे अमित यांच्यावर नाशिक महानगरपालिकेची जबाबदारी टाकण्यात आली आहे.त्यामुळे आता मनसे येणाऱ्या महापालिकानिवडणुकीत काय जादू दाखविते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *