मनोरंजन

अभिनेत्री शिल्पा ठाकरे यांनी सुपरस्टार दादा कोंडकेना केले आपल्या अंदाजमध्ये अभिवादन…!!

2.63Kviews

आज दादा कोंडके ह्यांचा स्मृतिदिन
(१४ मार्च, इ.स. १९९८ ; मुंबई, महाराष्ट्र) त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला.

द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या.वादग्रस्त दादांच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवातही वादग्रस्तच असायला हवी असाच विधीसंकेत असावा….. कोहिनूर सिनेमाच्या मालकांनी दादांच्या (सोंगाड्याच्या) आगाऊ आरक्षणाला बगल देऊन देवानंदचा ‘तीन देवियाँ’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. दादांनी बाळासाहेब ठाकरेंना साकडे घातले…… मग काय विचारता; शिवसैनिकांनी कोहिनूर बाहेर “राडा” घातला! कोहिनूरच्या मालकांना सेनेचा दणका मिळताच ‘सोंगाड्या’ प्रदर्शित करावयाचे सोंग आणावे लागले…… पण सोंगाड्या सुपर डुपर हिट्ट ठरला व मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली.

मार्च १४, १९९८ रोजी पहाटे ३. ३० ला रमा निवास ह्या दादरच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना बाजूच्याच सुश्रूषा नर्सिंग होम मध्ये हालवण्यात आले. आदल्याच दिवशी त्यांचे स्नेही डॉ. अनिल वाकणकरांनी त्यांना तपासले होते पण शेवटी त्यांचे सुश्रूषा हॉस्पिटलात प्राणोत्क्रमण झाले. त्यावेळी त्यांची मोठी बहीण लीलाबाई मोरे हयात होत्या. पुतण्या विजय कोंडकेंनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले…….

“सोंगाड्या” चित्रपटातील “माळ्याच्या माळ्यामधी कोण ग उभी” ह्या गाण्यावर माझा छोटासा प्रयत्न करून मी त्यांना विनम्र अभिवादन करते.

लिंक: https://youtu.be/6loYxc4l7aQ

Leave a Response