महिला विशेष लाइफफंडा

तुम्हाला ‘नैसर्गिक मेकअप’ हवाय? मग हि घ्या काळजी…

चेहरा सुंदर दिसण्यासाठी तुम्ही कितीही मेकअप करा पण मुळात जर तुमची त्वचा च निरोगी नसेल तर त्यावर वेळीच उपाय करा. सुंदर आणि तजेलदार त्वचा दिसण्यासाठी तुम्हाला मेकअप पेक्षा जास्त महत्वाचा आहे तुमचा संतुलित आहार आणि जीवनशैली. धकाधकीचे आयुष्य,प्रवास ,प्रदुषण,ताणतणाव ,ऑफिस तसंच घरातील काम इत्यादी गोष्टींमुळे आपल्याला स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे आपल्या आरोग्यासह त्वचेवर देखील वाईट परिणाम होऊ लागतात. त्वचेची देखभाल न केल्यास गंभीर त्वचा विकार उद्भवण्याची भीती असते.

मुरुम येणे, त्वचा काळवंडणे, चेहऱ्यावर डाग येणे इत्यादी समस्या देखील निर्माण होऊ शकतात.बाहेर बनवलेले, तेलकट आणि तिखट पदार्थ जर रोजच खात असतो तर त्यामुळे चेहऱ्यावर फोड येणे, त्वचा तेलकट होणे असे परिणाम दिसून येतात. बिस्किट्स, कुकीज किंवा कोणताही बेकारीतील पदार्थ खाणं शक्यतो टाळा.

त्वचेच्या या समस्या टाळण्यासाठी आपल्या स्किन केअर रुटीनवर लक्ष देण्यास सुरुवात करा. आहारामध्ये जास्तीत जास्त व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई आणि भरपूर प्रोटिन्स असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. पपई,कलिंगड,खरबूज,पेरू, जांभूळ,लिची इत्यादी फळे हि विशेषतः त्वचेसाठी लाभदायक आहेत. यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशी नष्ट होऊ देत नाहीत. तसेच व्हिटॅमिन सी हे त्वचेचा कोलोजन सुधारते. त्यामुळे व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा , फळांचा लिंबू,आवळा,संत्री,मोड आलेली कडधान्य रोजच्या जेवणात समावेश करावा आणि लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरचीचा वापर स्वयंपाकांत करावा.

त्वचेचे आरोग्य जपण्यासाठी तूप हि खूप फायदेशीर ठरते त्यामुळे तुपाचा समावेश जेवणात करा, गूळ त्वचेसाठी लाभदायक आहे, याची माहिती कित्येकांना नाही. गुळामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो, मुरुमांची समस्या कमी होते आणि चेहऱ्यावरील डाग देखील कमी होतात. तसंच चेहऱ्यावरील सुरकुत्याही दूर होतात. महत्वाचे हे कि, मुरुमांचा त्रास असणाऱ्यांनी व्हिटॅमीन ‘ए’ची कमतरता भरून काढण्याच्या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्यावीत.

गूळ त्वचा आणि केसांसाठी लाभदायक आहे, याची माहिती कित्येकांना नाही. गुळामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो, मुरुमांची समस्या कमी होते आणि चेहऱ्यावरील डाग देखील कमी होतात. तसंच चेहऱ्यावरील सुरकुत्याही दूर होतात. त्वचा निरोगी राहण्यासाठी आवश्यक असणारा पाणी हा घटक दुर्लक्षित राहतो . त्वचेचा ताजेपणा राखण्यास पाणी मदत करते. त्यामुळेच अधिकाधिक पाणी प्यावं. शिवाय ग्रीन टी घेणं हादेखील आपली त्वचा नितळ आणि पोषक ठेवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

त्वचा टवटवीत राहण्यासाठी थोड्या-थोड्या वेळानं चेहरा धुणं हा उत्तम उपाय आहे. चेहरा धुताना शक्यतो साबण लावू नये, कारण त्यामुळे चेहऱ्याची त्वचा कोरडा होण्याची शक्यता असते. ऋतुनुसार आपल्या सवयीत बदल घडवल्यास त्वचेला त्रास होणार नाही. त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊ लागतो, तेव्हा चेहरा मऊ आणि नितळ ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होतात.

सर्व ऋतूमध्ये अंघोळ झाल्यानतर मॉईश्चरायजर लावावं. त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी हे फार फायद्याचं ठरतं . हिवाळ्यात मेक-अप करण्यापूर्वी प्रथम त्वचा योग्य प्रकारे मॉइश्चराइझ करून घ्यावी. त्यानंतर तुम्ही क्रीम बेस मेक-अप करू शकता. शिवाय दुपारच्या उन्हातील हानिकारक अल्ट्रा व्हायोलेट किरण टाळण्यासाठी सनस्क्रीनचाही वापर करणे गरजेचे आहे.

तसेच डेली स्किन केअर रुटीनमध्ये क्लिनिंग, टोनिंग आणि मॉइश्चराइज हे तीन टप्पे पूर्ण होतील याची काळजी घ्या. हलका मेकअप करा , रोज रात्री झोपण्यापूर्वी मेकअप रिमूव्ह करून चेहरा स्वच्छ धुवावा. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक पाहिजे तर तर मग डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये जास्तीत नैसर्गिक उपचारांचा समावेश करा .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *