बातमी महाराष्ट्र राजकारण विदेश

‘बारमध्ये डान्स करणारे…’, संजय गायकवाडांचा देवेंद्र फडणवीसांवर ‘पलटवार’

बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी कालच (दि 19 एप्रिल) भाजप आमदार संजय कुटे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. याला फडणवीसांनीही उत्तर दिलं होतं. संजय गायकवाड यांची रात्रीची उतरली नसेल असं ते म्हणाले होते. यानंतर पुन्हा संजय गायकवाड यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.  बारमध्ये डान्स करणारे लोक देवेंद्र फडणवीसांचे सहकारी मंत्री होते. बुलढाण्याचे पालकमंत्री होते असा पलटवार संजय गायकवाड यांनी केला आहे.

संजय गायकवाड म्हणाले, मी मीडियाला कधी बाईट दिला याची त्यांना माहिती नसेल. संध्याकाळी 5 वाजता मी बोललो होतो तेव्हा सकाळी झाली नव्हती. तळीराम पाळायची सवय त्यांना आहे. मी जे बोललो त्यावर ठाम आहे असंही त्यांनी सांगितलं.

पुढं बोलताना गायकवाड म्हणाले, आम्हाला सल्ले देण्याआधी देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला सल्ला देऊन राज्याला मदत द्यायला सांगावं. फुकटचे सल्ले देण्याची गरज नाही. आमच्या आरोग्याची काळजी आम्हाला घेता येते. ते सल्ले उद्धव साहेब आम्हाला देतात. ते आम्ही ऐकतो असा टोलाही गायकवाड यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *