बातमी महाराष्ट्र राजकारण

चिपळूणमध्ये पिण्याचे पाणी आणि फूड पॅकेटस तातडीने पोहचवा,फडणवीस यांचा ठाकरे यांना फोन

चिपळूणमध्ये आलेल्या पुरामुळे एकच हाहाकार उडाला आहे.शेतापासून घरांपर्यतसर्वत्र पाणीच पानी झाले आहे.चिपळूणमध्ये नागरिक भयभीत झाले आहेत.चिपळूण येथील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.त्यामुळे पिण्यासाठी पाणी नाही वीज नाही खाण्यासाठी अन्न पदार्थ नाहीत अशा अवस्थेत चिपळूणकर आहेत.

त्यांना तातडीने फूड पॅकेटस आणि पिण्याचे पानी पोहचवा.असा फोन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.चिपळूणसह संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस पडत आहे,अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे.नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत,विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर माजी मंत्री गिरिज महाजन आणि इतर सहकारी यांनी या भागात दौरा करीत आहेत.पिण्याचे पानी आणि अन्नाची पॅकेटस यांची तातडीने गरज आहे.

या स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मी चर्चा करून पिण्याचे पाणी आणि अन्न पाकिटे पुरवण्यासाठी तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे. त्यांनी सरकार ते तत्काळ उपलब्ध करून देईल, असे सांगितले आहे. सरकारला आमचे संपूर्ण सहकार्य असेल,असे देखील फडणवीस यांनी संगितले आहे.अनेक ठिकाणी दरड कोसळून अनेकांनी त्यांच्या कुटुंबीयांना गमावले आहे,आम्ही त्यांच्या सोबत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *