क्रीडाताज्या बातम्या

#DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग होतोय ट्रेंड!

365views

सध्या ICC म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल च्या एका निर्णया च्या विरोधात नेटिझन्स चांगलेच नाराज झालेले दिसत आहेत. काय आहे तो निर्णय नक्की वाचा.

 

 

महेंद्रसिंह धोनीने बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात यष्टीरक्षण करताना पॅरा कंमाडोचं चिन्ह असलेले ग्लोव्हज घातले होते. या चिन्हाला ‘बलिदान चिन्ह’ असं म्हटलं जातं. केवळ पॅरा कमांडोच्या सदस्यांनाच हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळते. धोनीने २०११ साली लष्करातील लेफ्टनंट कर्नलचा मानद रँक देण्यात आला होता. त्यानंतर धोनीने पॅरा कमांडो होण्याचं प्रशिक्षणही घेतलं होतं. धोनीने दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात पॅरा कमांडोचं चिन्ह असलेले ग्लोव्हज घालून सैन्यदलाप्रती आदर व्यक्त केला.

पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे ग्लोव्हज वापरणं चुकीचं असल्याचं आयसीसीने बीसीसीआयला कळवलं आहे. धोनीने ग्लोव्हजवरील पॅरा कमांडोजचे चिन्ह हटवावे असे आवाहन आयसीसीने बीसीसीआय केले आहे.

वर्ल्डकपमध्ये भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने पॅरा कमांडोजचे मानचिन्ह असलेले ग्लोव्हज घातले होते. पण ही गोष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पटलेली नाही. आयसीसीने याबाबत म्हटले आहे की, ” आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळाडू जे पेहराव परीधान करताता किंवा जी उपकरण वापरतात त्याबाबत काही नियम आहेत. पेहराव आणि उपकरणांवर राजकीय किंवा धार्मिक गोष्टी असू नयेत, असे आम्हाला वाटते. याबाबत आम्ही बीसीसीआयला विनंती केली आहे.”

मात्र आयसीसीच्या या आदेशावर सोशल मीडियामधून जोरदार टीका सुरू आहे. #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे. अनेकांना आयसीसी चा हा आदेश पटला नसून अनेकांनी टीका केली आहे.

“आयसीसी ने धोनी च्या ग्लोव्हस वर लक्ष देण्या पेक्षा सामन्यात होणाऱ्या खराब अंपायरिंग कडे लक्ष द्यावं.” अश्या प्रकारे नेटिझन्सनी आयसीसीवर टीका केली आहे. तसेच बीसीसीआय आणि काही माजी क्रिकेटपटूंनी, कलाकारांनी आणि  खेळाडूंनी धोनीला समर्थन दिले आहे.

Leave a Response