लेख

दहशतवादी कारवाई, अमेरिका आणि भारतीय मीडियामधील फरक…

17.6Kviews

अमेरिकेने ज्या वेळी “ओसामा बिन लादेनला” पाकिस्थानच्या एबटाबाद शहरामध्ये मध्ये मारले होते त्या वेळी पाकिस्तानच्या अतिशय सुरक्षित अश्या लष्करी ठिकाणच्या अगदी जवळ असूनही अमेरिकन “नेव्ही सील” यांनी कोणतीही घाई गडबड न करता मेलेल्या ओसमाचे फेस रिकग्निशन (चेहऱ्यावरून ओळख पटवणे) केले होते, बरोबरीने तेथून निघतांना ओसामाच्या मारलेल्या नातेवाईकांचे रक्ताचे नमुने सुद्धा सोबत घेतले. जे नंतर ओसामाच्या DNA सोबत जुळवून अमेरिकन सील यांनी नक्की ओसामाचाच खातमा केला आहे याची पूर्ण खात्री करून घेतली. त्या नंतर अज्ञात समुद्रात प्रवास करणाऱ्या त्यांच्या एका जहाजावर ओसामाचे प्रेत नेण्यात आले व खोल समुद्रात विसर्जित करण्यात आले. (जर त्याला दफन केले असते तर कदाचित काही दिवसांत किंवा पुढच्या पिढीत ते ठिकाण आतंकवादयांचे प्रेरणा स्थान सुद्धा बनू शकले असते कदाचित या साठी घेतली गेलेली एकप्रकारची काळजी म्हणा).

हा सर्व घटनाक्रम पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी संपूर्ण जगाला समोर येऊन अतिशय थोड्या आणि मोचक्या शब्दात माहिती देत हे सांगितले होते की अमेरिकी सैन्या कडून ओसामा केव्हा आणि कुठे मारला गेला आहे. (हे सांगत असतांना कोठेही उन्माद नव्हता, अती उत्साह नव्हता किंवा उथळपणा तर अजिबातच नव्हता. आजही तुम्ही ते युट्युब वर पाहू शकता). सर्वात महत्वाचे म्हणजे तो परियन्त अमेरिके सहित जगातील कोणत्याही मीडिया हाऊसला असे काही झाले आहे याची पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. जेव्हा अधिकृतपणे ओबामा यांनी हे समोर येऊन जाहीर केले तेव्हा संपूर्ण जगाला आतंकी ओसामा मारला गेला हे समजले.

 

आता थोडं भारताकडे येऊ. ज्या वेळी 26/11 चा हल्ला मुंबई मध्ये चालू होता, त्यावेळी आमचे सगळे कर्तव्यदक्ष पत्रकार थेट लाईव्ह प्रक्षेपण करत होते, आतंकी कुठे गेले ? काय करत असतील ? काय खायला आणलं असेल ? कुठे आग लावली ? कुठे गोळ्या मारल्या ? आपले पोलीस कोणत्या बाजूने आज घुसण्याची तयारी करत आहेत ? या आणि सर्वच गोष्टी ही आपली बिनडोक भारतीय पत्रकारिता थेट लाईव्ह दाखवत होती व हे सर्व पाहून पाकिस्थानात बसलेले आतंकवाद्यांचे हँडलर त्यांना तिकडून आदेश देत होते. हे पुढे लक्षात ही आलं आणि सरकारकडून लाईव्ह टेलिकास्ट थांबण्यात आलं. परंतु तो परियन्त जे नुकसान व्हायचे होते ते झाले होते.

 

 

काल पुन्हा ज्या वेळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तान मध्ये घुसून धाडसी हल्ला केला तेव्हा या अतिउत्साही बिनडोक भारतीय मीडियाने निर्बुद्ध पणे वेगवेगळे जुने हवाई हल्ल्यातील व्हिडीओ सकाळपासूनच दाखवायला सुरवात केली. विशेष म्हणजे तो परियन्त भारताकडून अधिकृत अशी कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. परंतु तो परियन्त या भारतीय मीडियातील मूर्ख महाभागांनी बरेच व्हिडीओ जे पूर्ण चुकीचे व जुने होते ते दाखवत स्वतःची घालवली होती. बरोबरीने भारताकडून अधिकृतपणे कोणतीही आकडेवारी सांगण्यात आलेली नसतांनाही, किती आतंकवादी मारले गेले याचा आकडा सांगण्याची चढाओढ सुरू झाली होती. बऱ्याच चॅनल वरून अक्षरशः जुने व्हिडीओ, हल्याचे व्हिडीओ म्हणून दाखवले गेले. बरं मग या सोबत भडिमार आणि स्पर्धा सुरू होते ती ग्राफिक द्वारे बनवल्या गेलेल्या अतिशय फालतू अश्या रिपोर्टिंगची ज्यात विमाने कोठून आली ? हल्ला कसा झाला ? स्फोट कसे झाले ? हे दाखवण्याची आणि जोरजोरात ओरडण्याची.
मुळात त्यांनी त्यांच्या TRP साठी काय दाखवावे किंवा त्यांच्या राजकीय साध्यासाठी काय वृत्तांकन करावे हा पूर्णपणे त्यांचा हक्क आहे.

 

 

परंतु हा उथळपणा करत असताना संपूर्ण जग तुमच्याकडे पाहत आहे आणि तुमच्या या फालतू आणि पोरकटपणाला हसत तर नाही ना ? या मुळे भारताची जगातील विश्वासहर्ता तर कुठे खराब होत नाही ना ? या कडे सुद्धा एकदा लक्ष दिले पाहिजे. कारण यांच्या असल्या जीवघेण्या TRP च्या आणि राजकीय सोईच्या स्पर्धेत देश म्हणून आपल्या भारताची इज्जत जागतिक प्लॅटफॉर्मवर आपण घालवत नाही ना ? याचा एकदा तरी नीट विचार करायला हवा. जागतिक मीडिया यावर कसा व्यक्त होतोय या कडे सुद्धा लक्ष देणे तेव्हढेच गरजेचे आणि महत्वाचे आहे हे ही लक्षात असू दया. कारण भारताला जगाच्या पातळीवर इतर देशांचा पाठिंबा त्या मुळेच तयार होणार व मिळणार आहे. भारतातील या बाजारबूनग्या पत्रकारितेमुळे नव्हे.

1 Comment

  1. मुझे लगता हे भारतीय न्याय व्यवस्था ने तमाम माध्यमो को दंडीत करके इनके लिऐ आचारसंहिता ऐवम नियम बनाने चाहिए.

Leave a Response