राजकारण

हर्षद मेहता, दाऊद पासून ते भारताच्या पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांचेच सल्लागार होते स्वामीजी…

भारत आणि भारतातील लोक हे काही वेळेस न समजणाऱ्या गोष्टी पलीकडचे असतात. भारतात असे देखील लोक आहेत ,जे विदेशी लोकांना देखील आपल्या जाळ्यात अडकवितात. आणि असेच लोक स्वामीजी म्हणून नावारूपास येतात. बॉलीवुड मधील प्रसिद्ध कलाकार असो किंवा हॉलीवूडमधील स्टार किंवा भारतीय राजकारणी 90 च्या शतकात एका स्वामीजीने या सर्वाना वेड लावले होते.

हे स्वामी म्हणजे भगव्या वस्त्रातील चंद्रा स्वामी होय. लॉक डाऊन काळात हर्षद मेहता स्कॅम 1992 ही वेबसीरज खूप गाजली या वेब सीरजमध्ये हर्षद मेहताला मार्ग दाखविणारे गुरु दुसरे -तिसरे कोणी नसून हे चंद्रा स्वामी हेच होते. आज आपण चंद्रा स्वामी यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत. राजस्थान येथील बेहरोर गावात चंद्रा स्वामी यांचा जन्म झाला.त्यांनी येथेच तांत्रिक विद्या शिकली आणि पुढे अगदी तरुण वयात ते बिहारच्या जंगलात तपस्या करण्यासाठी निघून गेले. त्या नंतर जेव्हा ते राजकीय मार्गदर्शक झाले तेव्हा त्याची संपूर्ण जगाला ओळख झाली.

असे देखील म्हटले जाते तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव हे देखील चंद्रा स्वामी यांच्याकडून मार्गदर्शन घेत असे म्हटले जाते की पी. व्ही. नरसिंह राव यांच्या पंतप्रधान कार्यकाळात मंत्रिमंडळातील निर्णयता देखील स्वामीजी हस्तक्षेप करत. पी. व्ही. नरसिंह यांच्या कार्यकाळात दिल्लीत एका महत्वाच्या जागी स्वामिजिनी आश्रम बांधला होता. असे देखील म्हटले जातं होते की हे स्वामी देशयाविषयीची महत्वाची माहीत अतिरेकी लोक आणि देशविघातक कारवाई करणाऱ्या संघटना यांना पुरवत. 1980 – 1990 च्या दशकात स्वामीजी यांचा राजकीय लोकांवर फार जबरदस्त प्रभाव होता.

मोरारजी देसाई यांचे सरकार पाडण्यामध्ये देखील स्वामीजींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग मोठा होता. हे स्वामीजी अनेक चुकीची कामे करत पण त्याचे नाव कधीच समोर येत नसतं. ममता बॅनर्जी यांनी तर चंद्रा स्वामी यांना राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात यावे अशी शिफारस केली होती. ब्रिटनचे माजी पंतप्रधान मार्गारेट थेचर हे देखील स्वामीचे शिष्य होते. हिंदी अभिनेते राज बब्बर , हॉलीवुड अभिनेत्री एलिजाबेथ , असे त्याचे हायप्रोफाइल शिष्य होते. चंद्रा स्वामी जेव्हा दुबईला गेले तेव्हा दाऊद ने त्यांचे जंगी स्वागत केले होते. या घटनेनंतर त्यांच्याकडे संशयाने पहिले जाऊ लागले. पण पोलिस त्याच्यावर काहीच कारवाई करता येत नव्हती कारण त्याच्या विरोधात एक देखील गुन्हा नोंदविला गेला नव्हता. त्या नंतर एक दिवस अचानक चंद्रा स्वामी यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे नोंदविले जाऊ लागले.

स्वामीचे दिवस पलटले. स्वामीजीवर मोठी कारवाई तर तेव्हा झाली जेव्हा कॉंग्रेसने जाहीर केले की राजीव गांधी यांच्या हत्येमध्ये स्वामींचा हाथ आहे. असे म्हटले जाते की राजीव गांधी यांनी चंद्रा स्वामी यांच्या या काळ्या कारभारला विरोध केला त्यामुळे त्याच्या हत्येचा कट करण्यामध्ये स्वामीचे नाव आहे. राजेंद्र जैन या पत्रकाराने स्वामीजीचे पितळ उघडे करण्यासाठी अनेक पुरावे गोळा केले होते पण त्यांचा त्या आधीच खून करण्यात आला. अशा प्रकारे स्वामीनी अनेक गुन्हे दाबून टाकले होते. 2017 मध्ये चंद्रा स्वामी यांचे एका आजराने निधन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *