मनोरंजन

म्हणून बिग बींना आवडते ‘ही’ अभिनेत्री

महानायक अमिताभ बच्चन यांना कोणती अभिनेत्री आवडत असेल असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना अनेकदा पडलाच असेल मात्र आज त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. कारण खुद्द अमिताभ बच्चन यांनीच त्यांना आवडणाऱ्या अभिनेत्रीचे नाव सांगितले आहे.

सध्या कौन बनेगा करोडपती हा शो चांगलाच चर्चेत आहे. या शो दरम्यान बिग बी त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी सांगत असतात. नुकत्याच झालेल्या केबीसीच्या एका भागामध्ये स्पर्धकाला ‘राजी’ चित्रपटाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी स्पर्धकाने त्याला अभिनेत्री आलिया भट प्रचंड आवडत असल्याचे सांगितले. त्यावर अमिताभ यांनीही त्यांनाही आलियाच आवडत असल्याचे सांगितले आहे.

स्टारकिड्समध्ये आलिया मला जास्त आवडते असे ते म्हणाले आहेत. आम्ही ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करत आहोत. तिच्या अभिनयाचे एक वैशिष्ट्य आहे, ती कॅमेरासमोर अगदी सहज सामोरी जाते. कॅमेरासमोर तिचे हावभाव अगदी सहज असतात. त्यामुळे मला एक गोष्ट जाणवली की आताचे नवोदित कलाकार कोणतेही ओव्हर अॅक्टींग न करता सहज अभिनय करुन प्रेक्षकांची मन जिंकतात’, असे देखील अमिताभ बच्चन म्हणाले.