मनोरंजन

अमिताभ बच्चन यांचा जबरा चाहता करतो ‘हे’ काम

महानायक अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. मात्र बिग बींचा एक जबरा चाहता आहे. त्याने बिग बींच्या वाढदिवसानिमित्त चक्क आईसक्रीमचे मोफत वाटप केले आहे.

रमेशचंद्र गौड असे या चाहत्याचे नाव आहे. रतलाममध्ये ते राहायला आहेत. बिग बींच्या स्टाईलने ते दिवसभर आईसक्रीम विकत असतात. रमेशचंद्र हे बीग बींचे डायलॉग बोलतात, तर कधी त्यांच्या प्रसिद्ध गाण्यावर ठेका धरून जमलेल्या नागरिकांचे मनोरंजक करतात.

त्यांना त्यांच्या परिसरात डॉन म्हणून देखील ओळखले जाते. रतलामचा हा डॉन बिग बींच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचा फोटो लावून केक देखील कट करतो. डॉनने त्याच्या आईसक्रीमच्या गाडीवर बिग बींचे फोटो देखील लावले आहेत.