बॉलीवूड

‘हा’ अभिनेता पुरस्कार सोहळ्यात येतो स्त्रियांच्या वेशात

काही अभिनेते असे असतात की, त्यांच्या चित्रविचित्र अवतारामुळे ते नेहमी प्रसिध्द असतात. कुठल्याही कार्यक्रमात ते आपला वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न करतात. बिली पॉर्टर हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. तो देखील पुरस्कार सोहळ्यात नेहमी स्त्रियांच्या वेशात येतो. त्यामुळे त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या राहतात.

बिली पोर्टरला क्रॉस ड्रेसिंग करण्याची आवड असल्यामुळे तो अनेकदा मुलींच्या पेहरावात दिसतो. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात परिधान केलेल्या या पोषाखामुळे बिली पहिल्यांदा चर्चेत आला आहे.

बिली प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात मुलींचेच कपडे घालून जातो.

त्याच्या मते ट्रेंडमध्ये राहण्यासाठी तो असे विचित्र प्रकारचे पोशाख घालतो.