बॉलीवूड

दारु पिण्याच्या सवयीमुळे ‘या’ अभिनेत्रीने करिअरमधून घेतला ब्रेक

आपण अशी अनेक उदाहरणे ऐकली किंवा पाहिली असतील की, दारु पिण्याच्या सवयीमुळे लोकांची घरं  उध्दवस्त झाली, अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या अशी अनेक उदाहरणे आपल्या डोळ्या समोर असतील. मात्र बॉलिवूडच्या एका प्रसिध्द अभिनेत्रीने दारु पिण्याच्या सवयीमुळे  करिअर मधून ब्रेक घ्यावा लागला असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या श्रुति कमल हसनने आपल्या दारु पिण्याच्या सवयीचा मोठा खुलासा केला आहे. मागच्या काही दिवसांपासून श्रुति तिच्या खासगी जीवनामुळे चर्चेत आहे. टीव्ही शो ‘फीट अप विद द स्टार्स’मध्ये श्रुतिने सांगितले, ‘मला दारु पिण्याची सवय लागली होती आणि ही सवय पुढे इतकी वाढली की मला माझ्या करिअरमधून ब्रेक घ्यावा लागला असल्याचे ती म्हटली आहे.

View this post on Instagram

Happy Saturday peeps 🖤

A post shared by @ shrutzhaasan on

काही काळापूर्वीच मी खूप आजारी पडले होते. यावर उपचार झाल्यानंतर मला असं वाटलं की कदाचित मी दारुचे अतिसेवन केल्यामुळे आजारी पडले. त्यामुळे मी आता दारु पिण्याचे सोडून दिले आहे.’ काही दिवसांपूर्वी श्रुतिचे तिच्या बॉयफ्रेंड मायकल कॉरसेलशी ब्रेकअप झाले होते.

View this post on Instagram

🙏🏼 💥 Sunday mood

A post shared by @ shrutzhaasan on

एका मुलाखतीमध्ये श्रुति म्हणाली, मला त्याच्याबाबेत कोणतीही तक्रार नाही. माझ्यासाठी हे नातं खूप चांगला अनुभव होता. मी या नात्यात बऱ्याचं गोष्टी नव्याने शिकले. पण मी आता खऱ्या प्रेमाच्या शोधात असल्याचेही तिने सांगितले आहे.