मनोरंजन

कनिका कपूरचा कोरोनाचा तिसरा रिपोर्टही पॉझिटिव्ह

प्रसिध्द गायिका कनिका कपूरचा कोरोनाचा तिसरा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. सध्या कनिकाची प्रकृती स्थिर आहे. मंगळवारी कनिकाची तिसऱ्यांदा चाचणी करण्यात आली.

टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार कनिकाच्या पहिल्या दोन चाचणींच्या रिपोर्टवर तिच्या कुटुंबियांनी शंका उपस्थित केली होती. म्हणून तिची तिसऱ्यांदा चाचणी करण्यात आली. मात्र ही चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. कनिकाची पहिल्यांदा चाचणी केल्यावर आलेल्या रिपोर्टमध्ये तिचे वय आणि लिंग यांची माहिती चुकीची देण्यात आली होती. त्या रिपोर्टमध्ये कनिकाचे वय २८ वर्षे व लिंग महिला ऐवजी पुरुष लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे या रिपोर्टवर तिच्या कुटुंबीयांनी शंका उपस्थित केली होती.

दुसरीकडे कनिकाच्या संपर्कात आलेल्या २६६ जणांचा शोध घेण्यात आला. त्यांच्यापैकी ६० हून अधिक नमुने तपासले गेले. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.