मनोरंजन

कोरोनाग्रस्त गायिका कनिका कपूरचे नखरे पाहून डॉक्टर हैराण

गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. कनिकाला लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र कनिका हॉस्पिटल मध्ये देखील सेलिब्रेटी असल्यासारखे वागत आहे. कनिका उपचारादरम्यान डॉक्टरांना प्रतिसाद देत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

या हॉस्पिटलचे संचालक डॉ. आरके धीमान यांनी लेखी निवेदन जारी करत कनिका उपचारादरम्यान सहकार्य करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सर्व सुविधा पुरवल्यानंतरही तिचे नखरे कमी होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉ. आर. के. धिमान यांनी सांगिलतं की, तिच्यावर योग्य प्रकारे उपचार सुरू आहेत. पण, तिने एका स्टारसारखं वागू नये. ती आता पेशन्ट आहे आणि पेशन्टसारखंच वर्तन तिनं करावं. व्हिव्हिआयपी ट्रिटमेंट मिळावी यासाठी ती डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत आहे.