मनोरंजन

म्हणून कतरिनाला घासावे लागले भांडे; व्हिडिओ व्हायरल

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. देशातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिक घरी बसले आहेत. यामध्ये सेलिब्रेटींचाही सामावेश आहे. त्यामुळे सेलिब्रेटी सध्या घरी बसून आपल्या आवडीची काम करत आहे. आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सध्या अभिनेत्री कतरिना कैफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कोरोना व्हायरसमुळे जवळपास सर्वच कलाकारांच्या मेड सुट्टीवर आहेत. बाहेरुन जेवण मागवता येत नसल्यानं ते सुद्धा स्वतःच करावं लागत आहे. पण अशात मेड सुट्टीवर असल्यानं भांडी कोण घासणार हा सुद्धा प्रश्न पण कोणतेही काम करण्याची लाज कसली बाळगावी असं म्हणत कतरिना कैफनं तिच्या घरातली भांडी स्वतःच घासायला घेतली. तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

शेअर केल्या व्हिडीओमध्ये कतरिना भांडी कशी घासावीत हे सांगत आहे. सोबतच पाण्याचा अनावश्यक अपव्यय टाळा हेदेखील तिने सांगितलं. कतरिनाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, माझ्या घरात तुमचं स्वागत आहे, अशी कमेंट अर्जुन कपूरने केली आहे. तर एका अभिनेत्याने तिला कांताबेन 2.0 असं म्हटलं आहे.