मनोरंजन

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील राहत्या निवासस्थानी आज दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.

अरुण काकडे यांनी 94 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे त्यांनी अध्यक्षपदही भूषवले आहे. त्यांना संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास-सन्मान या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. कोणत्याही वादात न पडता सकस नाटकं करता यावीत, यासाठी त्यांनी १९७१ साली ‘आविष्कार’ संस्थेची पायाभरणी केली. वयाची ८५ वर्षे ओलांडली तरी त्यांच्यामधील नाटकासाठी काम करण्याची ऊर्जा युवकाला लाजवेल अशी होती.