मनोरंजन

ट्विंकल खन्ना एकेकाळी विकायची मासे

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना नेहमी निर्भीडपणे आपली मते मांडताना दिसते. यामुळे तिचा स्पष्टवक्तेपणा तिच्या चाहत्यांना भावतो. तिने नुकत्याच एका मुलाखतीत अनेक गोष्टींविषयी खुलासा केला आहे.

ट्विंकल म्हणते, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माझ्या आजीसोबत मासे विकण्याचं काम केलं होतं. मी माझ्या जीवनात अनेक नोकऱ्या केल्या. पण कोणत्या एका जागी राहणं मला आवडत नसे. ट्विंकल खन्नानं इंटीरिअर डेकोरेटर म्हणून सुद्धा काम केल आहे. तिनं एका वर्षात एकून 11 प्रोजेक्टवर काम केलं होतं या सगळ्याचा खुलासा तिने द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.