मनोरंजन

अन् ढसाढसा रडू लागली प्रियांका…

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोपडा सध्या तिचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या सिनेमाचे प्रमोशन तिने भारतातच नव्हे तर परदेशात देखिल केले आहे. प्रियांका नुकतीच एका अमेरिकन टॉप शोमध्ये तिच्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचली होती मात्र या शो दरम्यान असे काय झाले की, ती ढसाढसा रडू लागली होती.

प्रियांकाने अमेरिकेच्या टॉप शोमध्ये ‘द स्काय इज पिंक’चे प्रमोशन केले. दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रियांका जिमी फेलनचा लोकप्रिय शो’द टुनाइट शो विद जिमी फेलन’मध्ये पोहोचली. या शोमध्ये तिने मनमोकळेपणे खूप गप्पा मारल्या आपल्या सिनेमाविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या. पण त्यानंतर जिमीने ‘ईटिंग स्पाइसी विंग्स विद शॉन एवन्स’चा होस्ट शॉन एवन्ससोबत या शोमधील एक सेगमेंट ठेवलं होतं. या सेगमेंटमध्ये प्रियांका आणि जिमी यांना एक टास्क देण्यात आला होता. ज्यात प्रचंड तिखट चिकन विंग खाताना प्रियांका आणि जिमीला गप्पा मारायच्या होत्या. प्रियांकाने पहिला विंग तर आरामात संपवला. दुसरा तिला काहीसा तिखट लागला. पण तिसरा चिकन विंग खाताना मात्र तिच्या डोळ्यात पाणी आलं. तरीही तिनं टास्क पूर्ण करण्यासाठी चौथा विंग हातात घेतला पण तो खाताना प्रियांका अक्षरशः रडू लागली आणि तिनं गप्पा मारणंच बंद केलं होतं.

प्रियांकाचा हा रडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.