मनोरंजन

अमिषाला कधीही होऊ शकते अटक

अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात चेक बाउंस प्रकरणी रांची कोर्टाने अटक वॉरंन्ट काढले आहे. चित्रपट निर्माते अजय कुमारने अमिषावर पैसे उधार घेऊन परत न केल्याचा आरोप केला आहे.

२०१८ मध्ये देसी मॅजिक चित्रपट बनवण्यासाठी अजय कुमार यांनी अमिषाला अडीच कोटी रुपये उधार दिले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पैसे परत करेल असे अमिषाने सांगितले होते. पण २०१८ मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यानंतर दिग्दर्शकाने पैसे पुन्हा मागितले. पैसे मागितल्यानंतर अमिषाने अडीच कोटीचा चेकही दिला. पण चेक बँकेत टाकल्यानंतर तो बाउन्स झाला. याचप्रकरणी अमिषाविरोधात रांची न्यायालयात फसवणुकीचा खटला दाखल आहे.

वारंवार पैसे मागून देखिल अमिषाकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्याने दिग्दर्शकाने कायदेशीर नोटीस पाठवली. त्यालाही अमिषाने उत्तर दिले नाही. गेल्या वर्षी रांची न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर आता न्यायालयाने अटक वॉरंट जाहीर केले आहे.